CoronaVirus News : दिलासादायक! माकडांवर व्हॅक्सीनची यशस्वी चाचणी, चिनी वैज्ञानिकांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 10:22 PM2020-05-08T22:22:40+5:302020-05-08T22:31:57+5:30
यापूर्वी उंदरांवर टेस्ट करण्यात आली आहे. सायंस जर्नलच्या मते, संशोधकांनी म्हटले आहे, की Rhesus macaques हे जेनेटिक पातळीवर मानवाशी बरेच मिळते-जुळते असतात. यामुळे त्यांच्यावर औषधाचा परिणाम झाला तर तो मानवावरही होईल, असे मानले जाते.
पेइचिंग : चीनने कोरोनावरील एका व्हॅक्सीनचा माकडांवर यशस्वी प्रयोग केल्याचा दावा केला आहे. चीनमधील संशोधकांनी कोरोना व्हायरसच्या इनॅक्टिव्ह व्हॅक्सीनचा 'Rhesus macaques' नावाच्या माकडावर परीक्षण केले. या माकडांना तीन आठवड्यांपूर्वी इन्फेक्टेड करण्यात आले होते. पेइचिंगच्या सिनोवॅक बायोटेकने ही COVID-19 व्हॅक्सीन तयार केली आहे. या शिवाय चीनमधील आणखी तीन प्रॉजेक्ट क्लिनिकल ट्रायलच्या टप्प्यावर येऊन पोहोचले आहेत. एका अहवालानुसार, प्राण्यांवर करण्यात आलेली ही पहिलीच ट्रायल आहे.
आणखी वाचा - CoronaVirus News : 'या' 6 व्हॅक्सीन मानवासाठी ठरू शकतात वरदान, कोरोनाच्या विळख्यातून करू शकतात जगाची सुटका
माकडांमध्ये दिसून आला व्हॅक्सीनचा परिणाम -
यापूर्वी उंदरांवर टेस्ट करण्यात आली आहे. सायंस जर्नलच्या मते, संशोधकांनी म्हटले आहे, की Rhesus macaques हे जेनेटिक पातळीवर मानवाशी बरेच मिळते-जुळते असतात. यामुळे त्यांच्यावर औषधाचा परिणाम झाला तर तो मानवावरही होईल, असे मानले जाते. या माकडांना तीन आठवड्यांपूर्वी व्हॅक्सीन दिल्यानंतर कोरोना व्हायरसने इन्फेक्टेड करण्यात आले होते. यात ज्या माकडांना वॅक्सीन देण्यात आली होती. त्यांच्या फुफ्फुसातून व्हायरस नष्ट झाल्याचे दिसून आले. तर ज्यांना व्हॅक्सीन दिली गेली नाही, त्यांना निमोनिया झाल्याचे आढळून आले.
आणखी वाचा - CoronaVirus News : दीड महिन्यानंतर येऊ शकतं कोरोनावरील स्वस्त औषध, DGCIनं दिली 'क्लिनिकल ट्रायल'ची परवानगी
सप्टेंबरपर्यंत मिळू शकते व्हॅक्सीन -
चीनच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबरपर्यंत इमर्जन्सीसाठी व्हॅक्सीन तयार होऊ शकते. चीनमध्ये 508 व्हॉलंटिअर्स चायनीज अॅकॅडमी ऑफ मिलिट्री मेडिकल सायंसेसने तयार केलेल्या व्हॅक्सीनच्या दुसऱ्या टप्प्यावरील ट्रायलसाठी तयार आहेत. या महिन्यातच या ट्रायलचे रिझल्ट येऊ शकतात.
आणखी वाचा - CoronaVirus News: जूनमध्ये कोरोना हाहाकार माजवणार? आरोग्य मंत्रालयाने दिले 'असे' उत्तर