CoronaVirus News : कौतुकास्पद! ...अन् तिच्यासाठी डॉक्टर झाला गायक, Video पाहून तुम्हीही कराल सलाम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 12:11 PM2020-07-11T12:11:31+5:302020-07-11T12:15:30+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या संकटात वैद्यकिय क्षेत्रातील सर्वच कर्मचारी अहोरात्र काम करत आहे. घरापासून दूर राहून रुग्णांची सेवा करत आहेत. रुग्णांना आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

CoronaVirus Marathi News Doctor Sings Cheers Patient up Amid Corona Gloom | CoronaVirus News : कौतुकास्पद! ...अन् तिच्यासाठी डॉक्टर झाला गायक, Video पाहून तुम्हीही कराल सलाम

CoronaVirus News : कौतुकास्पद! ...अन् तिच्यासाठी डॉक्टर झाला गायक, Video पाहून तुम्हीही कराल सलाम

googlenewsNext

चीनमध्ये सुरू झालेल्या कोरोनाच्या संसर्गाने आता जगभरात हाहाकार माजवला आहे. अमेरिका आणि युरोपीयन देशांमध्ये हा व्हायरस वेगाने पसरत चालला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ही वेगाने वाढत आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 562,888 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर तब्बल 12,630,886 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अनेक जण आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी तत्पर असलेले पाहायला मिळत आहे. अशीच कौतुकास्पद घटना समोर आली आहे.

कोरोनाच्या संकटात वैद्यकिय क्षेत्रातील सर्वच कर्मचारी अहोरात्र काम करत आहे. घरापासून दूर राहून रुग्णांची सेवा करत आहेत. रुग्णांना आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. काही दिवसांपूर्वी रुग्णालयात डान्स करतानाचा एका डॉक्टरचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला होता. यानंतर आता असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. कोरोना रुग्णाच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी एक डॉक्टर चक्क गायक झाल्याचं समोर आलं आहे. रुग्णांना आनद देता यावा यासाठी डॉक्टर आपल्या परिने सर्व काही करत आहेत. 

इराकमधील एका डॉक्टरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यामध्ये एका वयोवृद्ध महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. तिच्यासाठी खास डॉक्टरने एक गाणं गायलं आहे. तसेच शेवटी मायेने तिच्या डोक्यावर चुंबन घेतलं आहे. यामुळे महिलाही भावूक झाली. हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला असून डॉक्टरचं भरभरून कौतुक केलं जात आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

कोरोना योद्धे आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करत आहेत. अशाच एका नर्सचा व्हिडीओ आता समोर आला आहे. चिलीची राजधानी सेंटियागो मधील El Pino रुग्णालयातील हा व्हिडीओ असल्याची माहिती मिळत आहे. रुग्णसेवा करून ड्युटी संपल्यानंतरही रुग्णालयात थांबून नर्स खास कोरोना रुग्णांसाठी वायोलिन वाजवते. डॅमारीस सिल्व्हा असं या 26 वर्षीय नर्सचं नाव असून ती ड्युटी संपल्यावर रुग्णांना अशा पद्धतीने आनंद देते. त्यांच्यात उत्साह निर्माण करते.  

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : धडकी भरवणारी आकडेवारी! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ

"...म्हणून लॉकडाऊनच्या दोन महिन्यांत बाळासाहेबांची आठवण आली" - शरद पवार

CoronaVirus News : चिंताजनक! "2021च्या आधी Corona Vaccine शक्य नाही"

CoronaVirus News : सलाम! ...म्हणून ड्युटी संपल्यावर खास कोरोनाग्रस्तांसाठी नर्स वाजवते वायोलिन

"मंदिराच्या समोर आल्यावर फोन करा", डिलिव्हरी पॅकेटवरचा पत्ता पाहून चक्रावून जाल

लय भारी! कोरोनामुळे नोकरी गेली पण नशिबाने केलं 'या' भारतीय जोडप्याला मालामाल

 

Web Title: CoronaVirus Marathi News Doctor Sings Cheers Patient up Amid Corona Gloom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.