CoronaVirus News : "कोरोनावरील उपचाराबाबत दोन आठवड्यात देणार 'खूशखबर', करणार मोठी घोषणा"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 02:54 PM2020-07-28T14:54:20+5:302020-07-28T15:08:07+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरात युद्धपातळीवर कोरोना व्हाययरसवर औषध आणि लस शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी चाचण्यांना यश आले आहे. याच दरमान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे.
जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. अमेरिका, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जगभरात युद्धपातळीवर कोरोना व्हाययरसवर औषध आणि लस शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी चाचण्यांना यश देखील आले आहे. याच दरमान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठं विधान केलं आहे.
येत्या काही दिवसांत कोरोना उपचारासंदर्भात खूशखबर असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. पुढील दोन आठवड्यांमध्ये कोरोनावरील उपचारासंबंधी आपल्या प्रशासनाकडून एका चांगल्या बातमीची घोषणा करण्यात येईल असं ट्रम्प यांनी सांगितलं आहे. एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हे महत्त्वाचं विधान केलं आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. अमेरिकेतील कोरोनाबधितांचा आकडा 42 लाखांहून अधिक झाला आहे. अमेरिकेतील परिस्थिती दिवसेंदिवस कोरोनामुळे गंभीर होत चालली आहे.
CoronaVirus News : कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी औषधं ठरताहेत प्रभावी पण...https://t.co/m6d6ZNccX8#coronavirus#CoronaUpdates#COVID19#WHO
— Lokmat (@MiLOKMAT) July 28, 2020
अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून आतापर्यंत 1 लाख 46 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनापुढे अमेरिकेसारखा मोठा देशही हतबल झाला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. रॉबर्ट ओ ब्रायन (Robert O'Brien) यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, रॉबर्ट ओ ब्रायन यांनी चाचणीचा रिपोर्ट आल्यावर स्वत:ला आयसोलेट केलं आहे.
CoronaVirus News : धोका वाढला! कोरोनामुळे परिस्थिती गंभीरhttps://t.co/JOqHJYcLJx#coronavirus#CoronaUpdates#COVID19#WHO
— Lokmat (@MiLOKMAT) July 28, 2020
जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 16,643,498 वर गेली असून 656,621 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर आतापर्यंत 10,231,837 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाने थैमान घातलेले असतानाच अनेक दिलासादायक घटना समोर येत आहे. जगभरात कोरोनासंदर्भात संशोधन सुरू असून शास्त्रज्ञांना यश मिळत आहे. याच दरम्यान कोरोनाच्या या लढ्याला आणखी एक मोठं यश मिळालं आहे. शास्त्रज्ञांना कोरोनाला रोखणारी तब्बल 21 औषधं सापडल्याची माहिती मिळत आहे. ही औषधं कोरोना व्हायरसचा प्रसार रोखू शकतात. सॅनफोर्ड बर्नहम प्रीबायस मेडिकल डिस्कवरी इन्स्टिट्यूट ऑफ अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी हे संशोधन केलं आहे.
CoronaVirus News : अरे व्वा! जगभरातील तब्बल एक कोटी लोकांनी जिंकली कोरोनाची लढाईhttps://t.co/EyMtsrUfQ0#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia
— Lokmat (@MiLOKMAT) July 28, 2020
महत्त्वाच्या बातम्या
कौतुकास्पद! भारताच्या लेकींची कमाल, शोधला मंगळाच्या कक्षेत फिरणारा नवा 'लघुग्रह'
CoronaVirus News : परिस्थिती गंभीर! 'या' देशात कोरोनाचा उद्रेक, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना लागण
सप्तपदीनंतर नवरा-नवरी पोहोचले थेट पोलीस ठाण्यात; कारण ऐकून तुम्हीही कराल भरभरून कौतुक
CoronaVirus News : मोठं यश! कोरोनाला रोखणारी 21 औषधं सापडली; शास्त्रज्ञांचा दावा
CoronaVirus News : चिंताजनक! 6 आठवड्यात कोरोनाग्रस्तांमध्ये दुप्पट वाढ; WHOने बोलावली इमर्जन्सी बैठक
CoronaVirus News : लढ्याला यश! फक्त 400 रुपयांत होणार कोरोना टेस्ट, एका तासात येणार रिपोर्ट
CoronaVirus News : कडक सॅल्यूट! जंगलातून रस्ता पार करत 'ही' नर्स लोकांपर्यंत पोहचवते मोफत औषधं