CoronaVirus News : कोरोना वेगाने पसरतोय! 'या' देशात पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 09:54 AM2020-10-29T09:54:27+5:302020-10-29T09:54:42+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: प्रगत देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. याच दरम्यान फ्रान्समध्ये कोरोनाचा धोका वाढला आहे.
जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रगत देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. याच दरम्यान फ्रान्समध्ये कोरोनाचा धोका वाढला आहे. पुन्हा एकदा देशामध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट हा अत्यंत कमी आणि संक्रमणाचा वेग दुप्पट असल्याने प्रशासनाला पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करावी लागली आहे.
फ्रान्सच्या इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी बुधवारी आपल्या देशात पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या लॉकडाऊन दरम्यान शाळा आणि काही कामाची कार्यालयं सुरू राहणार आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या वाढत्या घटनांमुळे लॉकडाऊनच्या नवीन गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत. कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ झाल्यामुळे युरोपमधील रुग्णालयं आता अपुरी पडत असल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे देशात सध्या कोरोनाशी लढण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय आहे. शुक्रवारपासून देशभरात लॉकडाउन लागू करण्यात येणार आहे.
CoronaVirus News : चीनमध्ये पुन्हा पसरतोय कोरोना, लोकांमध्ये भीतीचे वातावरणhttps://t.co/LY2hthNnbC#China#ChinaVirus#coronavirus
— Lokmat (@MiLOKMAT) October 27, 2020
फ्रान्समध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 12 लाखांहून अधिक
लॉकडाऊनमध्ये फ्रान्समधील सर्व रेस्टॉरंट्स, बार आणि अनावश्यक व्यवसाय बंद राहतील. कारखाने, शेती आणि बांधकाम यांचे काम चालू ठेवता येईल. याशिवाय नर्सिंग होमसुद्धा सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत फ्रान्सचा 5 वा क्रमांक आहे. वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार. मंगळवारी कोरोनामुळे फ्रान्समध्ये 530 लोकांचा मृत्यू झाला. तर 33 हजार 417 रुग्ण आढळून आले आहेत. फ्रान्समध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 12 लाखांहून अधिक आहे. तर आतापर्यंत 35 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.
CoronaVirusVaccine : कोरोनाच्या संकटात आशेचा किरण! स्वदेशी लसीसंदर्भात कंपनीने केला मोठा दावाhttps://t.co/nZFjAR8BDo#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#CoronaVaccine#BharatBiotech
— Lokmat (@MiLOKMAT) October 24, 2020
फ्रान्समध्ये दुसऱ्यांदा आरोग्य आणीबाणी लागू
फ्रान्समध्ये 1 लाख 13 हजार रुग्ण कोरोनावर मात करून बरे झाले आहेत. 10 लाखहून अधिक लोकांवर सध्या उपचार सुरू आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. फ्रान्समध्ये आता कोरोनाची दुसरी लाट पसरायला सुरुवात झाली आहे. या लाटेचा फटका जास्तीत जास्त लोकसंख्येला बसू नये यासाठी काही दिवसांपूर्वी फ्रान्सच्या सरकारने देशात आणीबाणी लागू केली आहे. फ्रान्समध्ये दुसऱ्यांदा आरोग्य आणीबाणी लागू करण्यात आली. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ही आणीबाणी जाहीर करण्यात आली.
"कोरोनाला रोखण्यासाठी कठोर पावले उचलणे अनिवार्य"
इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी याआधी सध्याच्या स्थितीत कोरोनाला रोखण्यासाठी कठोर पावले उचलणे अनिवार्य आहे. कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी कडक निर्बंध लागू केले पाहिजेत. याशिवाय पॅरिसमध्ये आणि कोरोनाचा संसर्ग जास्त असलेल्या ठिकाणी रात्रीच्या वेळी कर्फ्यूची घोषणा केली आहे. मॅक्रॉन यांनी 9 शहरांमधील रहिवासीयांना रात्री 9 ते पहाटे 4 या वेळेत त्यांच्या घरी रहावे, असे आवाहन केले होते. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
CoronaVirus News : कोरोनाचा विळखा! मृत्यूच्या 18 तासांनंतरही शरीरात व्हायरस जिवंत; शवविच्छेदनातून समोर आलेल्या माहितीने वाढवली चिंता https://t.co/GFinH3wrhr#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia
— Lokmat (@MiLOKMAT) October 24, 2020