CoronaVirus : धक्कादायक; अमेरिकेत कोरोना पॉझिटिव्ह कुत्र्याचा मृत्यू, तपासात समोर आली 'ही' मोठी बाब
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 04:17 PM2020-07-31T16:17:26+5:302020-07-31T16:24:51+5:30
या श्वानाचे मालक रॉबर्ट मॅहोनी न्यूयॉर्कमध्ये राहतात. त्यांनाही एप्रिल महिन्यातच कोरोनाची लागण झाली होती.
न्यूयॉर्क - कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात हाहाकार घातला आहे. मानवाबरोबरच प्राणीही कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. यासंदर्भात अनेक अहवालांतून दावा आणि पुष्टीही करण्यात आली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, अमेरिकेत एक कोरोना संक्रमित श्वान (कुत्रा) आढळून आला होता. आता आलेल्या वृत्तानुसार, या श्वानाचा मृत्यू झाला आहे.
या श्वानाचे नाव 'बडी', असे होते. तो जर्मन शेफर्ड जातीचा होता. या 7 वर्षांच्या श्वानात एप्रिल महिन्यातच कोरोनाची लक्षणं दिसून आली होती. या श्वानाचे मालक रॉबर्ट मॅहोनी न्यूयॉर्कमध्ये राहतात. त्यांनाही एप्रिल महिन्यातच कोरोनाची लागण झाली होती.
बडीला सुरूवातीला श्वास घ्यायला त्रास होत होता. यानंतर रोजच्या रोज त्याचा हा त्रास वाढत गेला. मे महिन्यात एका व्हेटर्नरी डॉक्टरने बडीला कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी केली होती. अमेरिकेच्या एका वृत्त संस्थेने यासंदर्भात माहिती देताना सांगितले होते, की न्यूयॉर्कमध्ये एका जर्मन शेफर्ड श्वानाला कोरोनाची लागण झाली असून तो देशातील कोरोनाची लागण झालेला पहिला श्वान आहे. बडीची प्रकृती अधिकाधिक खराब होत गेली आणि अखेर 11 जुलैला त्याचा मृत्यू झाला.
बडीच्या रक्त तपासणीतून इम्यून सिस्टिमच्या कॅन्सरचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे बडीचा मृत्यू नेमका कोरोना संक्रमणाने झाला, की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अमेरिकेने अतापर्यंत अनेक प्रण्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची पुष्टी केली आहे. सरकारी आकडेवारीप्रमाणे, 12 श्वानांना, 10 मांजरांना, एका सिंहाला आणि एका वाघाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मात्र, प्राण्यांना एकमेकांपासून कोरोना झाल्याचे पुरावे मिळालेले नाहीत. पण, काही परिस्थितीत मानवाकडून हे संक्रमण जनावरांपर्यंत पसरण्याची शक्यता वाटते, असे अमेरिकेने म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
ठाकरे सरकारला इशारा; "बकरी ईदला कुर्बानी देण्यात अडथळा आणल्यास आंदोलन करणार"
100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर
लॉकडाउनमध्ये 'हा' साबण ठरला नंबर-1; लाईफबॉय अन् लक्सलाही टाकलं मागे
15 ऑगस्ट : सरकारचा मोठा निर्णय, लष्करी अधिकारी समारंभापर्यंत क्वारंटाइन
युवकाच्या 'जीन्स'मध्ये घुसला 'कोब्रा', खांबाला धरून काढावी लागली अख्खी रात्र; मग...
Coronavirus Vaccine : जगभरात 150 व्हॅक्सीनवर काम सुरू; पण रेसमध्ये टॉपवर फक्त 'या' 4 लसी