CoronaVirus News : काय सांगता? मास्क लावायला विसरल्या मंत्री, भीतीने केलं असं काही...; Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 01:16 PM2020-07-17T13:16:25+5:302020-07-17T13:17:27+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावण्याचा सल्ला दिला जातो. काही ठिकाणी मास्क न लावल्यास दंड देखील भरावा लागतो. याच दरम्यान एक मंत्रीच चक्क मास्क लावायला विसरल्या आहेत.
जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. अनेक देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 592,690 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर रुग्णांची संख्या ही एक कोटीच्या वर गेली आहे. तब्बल 13,949,386 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 8,278,974 लोक बरे झाले आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावण्याचा सल्ला दिला जातो. काही ठिकाणी मास्क न लावल्यास दंड देखील भरावा लागतो. याच दरम्यान एक मंत्रीच चक्क मास्क लावायला विसरल्या आहेत.
फ्रान्समध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे. मात्र अशातच परेडसाठी उपस्थित असलेल्या फ्रान्सच्या मंत्रीच मास्क घालायला विसरल्याची घटना समोर आली आहे. मास्क घालायला विसरले हे लक्षात येताच त्यांनी हाताने तोंड झाकून घेतलं. मास्क मिळेपर्यंत मंत्री आपल्या तोंडावर हात ठेवून उभ्या राहिल्या. या घटनेचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. एग्नेस पॅन्नियर रनर असं या फ्रान्मसधील मंत्र्यांचं नाव आहे.
A French minister buried her face in her hands after she realized she had arrived at the annual national day parade and forgotten her mask https://t.co/LMRITtcE4opic.twitter.com/kgEboxF0j7
— Reuters (@Reuters) July 15, 2020
एग्नेस पॅन्नियर रनर पॅरिसमधील बॅस्टिल डे कार्यक्रमाला उपस्थित होत्या. त्या प्लेस डे ला कॉनकॉर्डला आपल्या कारने पोहोचल्या. त्यानंतर उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना भेटणं सुरू केलं. तेव्हा सर्वांच्या चेहऱ्यावर त्यांनी मास्क असल्याचं पाहिलं आणि आपण मास्क घालायला विसरलो हे त्यांच्या लक्षात आलं. मास्क नसल्याने त्यांनी हाताने तोंड झाकलं आणि आपल्या गाडीच्या दिशेने धावू लागल्या. रॉयटर्सने याबाबत वृत्त दिलं आहे.
CoronaVirus News : महासत्ता असलेल्या अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार! रुग्णांची संख्या 35 लाखांवरhttps://t.co/ReDBBXswBn#coronavirus#CoronaUpdate#America
— Lokmat (@MiLOKMAT) July 17, 2020
एग्नेस यांनी अधिकाऱ्यांना इशाऱ्याने मास्कबाबत सांगितलं. तोपर्यंत त्या आपल्या तोंडावर हात ठेवून उभ्या राहिल्या. काही वेळाने अधिकाऱ्याने त्यांना मास्क आणून दिल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे आहे. जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. अमेरिका, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे.
84 वर्षांच्या आजींनी बेडचा बॉक्स उघडला पण...; CCTV तून समोर आला धक्कादायक प्रकारhttps://t.co/rm4DEB3u3L
— Lokmat (@MiLOKMAT) July 17, 2020
महत्त्वाच्या बातम्या
भयंकर! चॅनल बदलण्यासाठी रिमोटचा हट्ट बेतला जीवावर, 7 वर्षांच्या चिमुकलीची हत्या
CoronaVirus News : त्या तिघांनी दिले पाचशेहून अधिक कोरोनारुग्णांना जीवनदान
बापरे! बेडच्या बॉक्समध्ये चुकून लॉक झाल्या आजी अन्..; जाणून घ्या नेमकं काय घडलं?
CoronaVirus News : कोरोनापुढे अमेरिकाही हतबल! 24 तासांत आढळले तब्बल 68,428 नवे रुग्ण
CoronaVirus News : 'प्लाझ्मा दान करा आणि 5000 मिळवा'; 'या' सरकारने घेतला मोठा निर्णय