CoronaVirus News : खरंच की काय? लॉकडाऊनमध्ये वाया गेलेली वाईन वाचवणार आता लोकांचा जीव; पण कसा...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 09:08 AM2020-06-06T09:08:36+5:302020-06-06T09:12:56+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: लॉकडाऊनचा अनेक व्यवसाय, उद्योगधंद्यांवर परिमाण झाला आहे. मद्य व्यवसायालाही लॉकडाऊनचा फटका बसला आहे. जगभरातील बार, रेस्टॉरंट्स बंद झाले.
जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. जगातील सर्वच देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या ही तब्बल 68 लाखांवर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 398,147 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 6,844,838 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे.
लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टी बंद आहेत. लॉकडाऊनचा अनेक व्यवसाय, उद्योगधंद्यांवर परिमाण झाला आहे. मद्य व्यवसायालाही लॉकडाऊनचा फटका बसला आहे. जगभरातील बार, रेस्टॉरंट्स बंद झाले. दुकानातील दारू विक्रीही बंद झाली आणि त्यामुळे कित्येक कोटी लीटर वाईन वाया गेली आहे. मात्र आता हीच वाया गेलेली वाईन लोकांसाठी उपयुक्त ठरणार असून जीव वाचवण्यासाठी मदत करणार आहे. द गार्डियनच्या वृत्तानुसार, फ्रान्ससह संपूर्ण युरोपमध्ये वाईनची विक्री न झाल्याने वाईन उत्पादित करणाऱ्या कंपन्यांचं मोठं नुकसान झालं.
CoronaVirus News : Aspirin ने उपचार करणं शक्य?, 'हे' आहे फॅक्ट चेकhttps://t.co/hr6I22oNoe#coronavirus#CoronavirusIndia#CoronaVirusUpdates#Covid_19india
— Lokmat (@MiLOKMAT) June 6, 2020
वाईनचा नवा सिझन येतं आहे. म्हणजेच नव्याने वाईन तयार होणार आहे. अशातच लॉकडाऊनमध्ये उरलेला स्टॉक कसा ठेवायचा ही समस्या आहे. फक्त फ्रान्समध्ये 30 कोटी लीटर वाईन वाया जाणार आहे. पण आता या शिल्लक राहिलेल्या वाईनपासून इथेनॉल किंवा हँड जेल तयार केलं जाणार आहे. जे सॅनिटायझरच्या रुपात वापरलं जाईल. म्हणजे कोरोना व्हायरसमुळे ज्या वाईनची विक्री झाली नाही, त्यापासून आता सॅनिटायझर तयार केलं जाणार आहे. अशा पद्धतीने वाया गेलेली वाईन वेगळ्या रूपात आता लोकांचा जीव वाचवणार आहे.
CoronaVirus News : जवळपास 6800 मुलांना करण्यात आलं क्वारंटाईनhttps://t.co/085ewdsvME#coronavirus#CoronaUpdates#schoolsreopening#Students
— Lokmat (@MiLOKMAT) June 4, 2020
कोरोना व्हायरसपासून लोकांचा बचाव करण्यासाठी हे अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. फ्रान्समधील 20 कोटी लीटर वाईन जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. 10 कोटी वाईनचं काय केलं जाणार आहे, याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. कोरोनामुळे वाईन उत्पादकांचं मोठं नुकसान झालं आहे. फक्त फ्रान्समध्येच नाही तर इटली आणि स्पेनसारख्या कित्येक देशांमध्ये अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे युरोपियन युनियन आणि या देशांनी या व्यापाऱ्यांची मदत करण्याची योजना तयार केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कामगारांना परत कामावर बोलावणं हे व्यावसायिकांसाठी आव्हानhttps://t.co/5eK96UWvYR#CoronaUpdatesInIndia#coronavirus#CoronaLockdown
— Lokmat (@MiLOKMAT) June 4, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : सर्वसामान्यांसाठी खूशखबर! 'या' जीवनावश्यक वस्तू झाल्या स्वस्त
CoronaVirus News : शाळा सुरू करणं 'या' देशाला पडलं महागात; तब्बल 261 जणांना कोरोनाची लागण
CoronaVirus News : लवकर रेस्टॉरंट सुरू होणार, 'या' गोष्टी बदलणार; जाणून घ्या नेमकं कसं असणार?
CoronaVirus News : मजुरांना कामावर परत बोलावण्यासाठी त्याने लढवली अनोखी शक्कल; केलं असं काही...