CoronaVirus News : अमेरिकेत भारतीय वंशाच्या डॉक्टरची कमाल; कोरोना रुग्णावर केली यशस्वी शस्त्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 12:19 PM2020-06-12T12:19:51+5:302020-06-12T12:26:44+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: महासत्ता असलेल्या अमेरिकेमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. 

CoronaVirus Marathi News indian origin doctor us transplanted lungs-covid19 patient | CoronaVirus News : अमेरिकेत भारतीय वंशाच्या डॉक्टरची कमाल; कोरोना रुग्णावर केली यशस्वी शस्त्रक्रिया

CoronaVirus News : अमेरिकेत भारतीय वंशाच्या डॉक्टरची कमाल; कोरोना रुग्णावर केली यशस्वी शस्त्रक्रिया

Next

जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. जगातील सर्वच देश कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहेत. कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतंही औषध उपलब्ध झालेलं नाही. कोरोना व्हायरसवर लस आणि औषध शोधण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. जगातील कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 75 लाखांवर पोहोचली असून  मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा तब्बल चार लाखांच्या वर पोहोचला आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही अमेरिकेतील रुग्णांची आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. 

कोरोनाच्या लढ्यात भारतीय वंशाच्या एका डॉक्टरने कमाल केली आहे. अमेरिकेमध्ये कोरोना रुग्णावर झालेल्या एका शस्त्रक्रियेमध्ये भारतीय वंशाच्या एका डॉक्टरने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अंकित भारत असं या डॉक्टरचं  नाव असून त्यांच्या नेतृत्त्वात कोरोनामुळे फुफ्फुसावर गंभीर परिणाम झालेल्या महिलेवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. महिलेच्या शरीरात फुफ्फुसाचे प्रत्यारोपण (lung transplant) करण्यात आले आहे. कोरोनाच्या लढाईतील अमेरिकेतील ही पहिली यशस्वी शस्त्रक्रिया आहे.

अंकित भारत यांचा जन्म हा उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये झाला असून अमेरिकेत कार्यरत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे महिलेच्या फुफ्फुसावर वाईट परिणाम झाला होता. शस्त्रक्रिया करून फुफ्फुसाचे प्रत्यारोपण करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. भारतीय वंशाच्या अंकित यांच्या नेतृत्वात करण्यात आलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. 'माझ्या आयुष्यातील ही सर्वात मोठी शस्त्रक्रिया होती. ही शस्त्रक्रिया यशस्वी करणं फार मोठं आव्हान होतं' अशी प्रतिक्रिया अंकित यांनी दिली आहे.

शिकागो येथील नार्थवेस्टर्न मेडिसिन रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या महिलेचं वय हे 20 ते 25 वर्षांदरम्यान होते. शस्त्रक्रिया करणाऱ्या टीमचे प्रमुख आणि भारतीय वंशाचे डॉक्टर अंकित यांनी महिलाला जिवंत ठेवण्यासाठी फुफ्फुसाचे प्रत्यारोपण करण्याचा एकमेव पर्याय उपलब्ध असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर डॉक्टरांना मोठं यश मिळालं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : परिस्थिती गंभीर! कोरोनाचा भीतीदायक रेकॉर्ड; गेल्या 24 तासांत तब्बल 10,956 नवे रुग्ण

CoronaVirus News : मृत्यूनंतरही होताहेत हाल! 14 मृतदेहांचा 'तो' धक्कादायक Video व्हायरल

"आता आपल्याकडे मौनेंद्र मोदी आहेत ते..."; भारत-चीन सीमावादावरून पंतप्रधानांवर निशाणा

CoronaVirus News : बापरे! तब्बल 35 निगेटिव्ह लोकांना दिला कोरोनाचा 'पॉझिटिव्ह' रिपोर्ट अन्...

CoronaVirus News : आशेचा किरण! कोरोनाच्या लढ्याला यश येणार, मांजरींवरील 'हे' औषध प्रभावी ठरणार?

CoronaVirus News : धोक्याची घंटा! कोरोनामुळे जगात तब्बल 10 कोटी लोकांचा होऊ शकतो मृत्यू

Web Title: CoronaVirus Marathi News indian origin doctor us transplanted lungs-covid19 patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.