CoronaVirus News : शाळा सुरू करणं 'या' देशाला पडलं महागात; तब्बल 261 जणांना कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 09:31 PM2020-06-04T21:31:29+5:302020-06-04T21:40:05+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काही देशांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. मात्र एका देशाने शाळा सुरू केल्या. पण हे करणं त्यांना चांगलंच महागात पडलं आहे. 

CoronaVirus Marathi News israel reopening school 261 children infected covid 19 | CoronaVirus News : शाळा सुरू करणं 'या' देशाला पडलं महागात; तब्बल 261 जणांना कोरोनाची लागण

CoronaVirus News : शाळा सुरू करणं 'या' देशाला पडलं महागात; तब्बल 261 जणांना कोरोनाची लागण

googlenewsNext

जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. जगातील कोरोनाग्रस्ताचा आकडा हा 65 लाखांवर गेला आहे. तर तीन लाखांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अनेक देशांमध्ये लॉकडाऊनमध्ये सुरू आहे. तर काही देशांनी कोरोनावर नियंत्रण मिळवलं असून तेथील अनेक गोष्टी सुरू करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काही देशांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. मात्र एका देशाने शाळा सुरू केल्या. पण हे करणं त्यांना चांगलंच महागात पडलं आहे. 

इस्त्राईलने कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवलं आहे. त्यामुळेच मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय देशाला महागात पडला आहे. शाळेतील तब्बल 261 मुलं आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर जवळपास 6800 मुलांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. NPR ने दिलेल्या वृत्तानुसार, इस्त्राईलच्या शाळेतील 261 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली. शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 261 कोरोना संक्रमितांमध्ये 250 मुलं आहेत. यानंतर 6800 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.  

इस्त्राईलमधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 17,377 वर पोहोचली आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या अचानक वाढत असल्याने इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी शाळा अनिश्चित काळापर्यंत बंद करण्याचे आदेश दिलेत. जोपर्यंत शाळेतील मुलं आणि कर्मचारी पूर्णपणे कोरोनामुक्त होत नाहीत तोपर्यंत शाळा सुरू होणार नाही असं पंतप्रधानांनी सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. भारतात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

काही दिवसांपासून 15 जूनपर्यंत शाळा-महाविद्यालये सुरू होणार अशी चर्चा सुरू होती. शाळा-महाविद्यालये कधी सुरू होणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबत आता एक स्पष्टीकरण दिलं आहे. देशभरातील शाळा, महाविद्यालय तसेच शैक्षणिक संस्था सुरू कऱण्यासाठी कोणतीही परवानगी देण्यात आली नसल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात आली आहे. लॉकडाऊन उघडल्यानंतर शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टीने काही बदल होऊ शकतात.

 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : लॉकडाऊनचा फटका! ...म्हणून सिंगापूरमध्ये शेफ असलेल्या तरुणाला चाराव्या लागताहेत बकऱ्या

Kerala Elephant Death: "हत्तीणीने कोणाचं काय वाईट केलं होतं?, तिला मारणाऱ्यांची संस्कृती कोणती?"

CoronaVirus News : लवकर रेस्टॉरंट सुरू होणार, 'या' गोष्टी बदलणार; जाणून घ्या नेमकं कसं असणार?

CoronaVirus News : मजुरांना कामावर परत बोलावण्यासाठी त्याने लढवली अनोखी शक्कल; केलं असं काही...

CoronaVirus News : सर्वसामान्यांसाठी खूशखबर! 'या' जीवनावश्यक वस्तू झाल्या स्वस्त

CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात अमेरिका मैत्री निभावणार; भारताला 'ही' मदत करणार

CoronaVirus News : ...म्हणून चेन खेचून मजुरांनी काढला ट्रेनमधून पळ; रेल्वे स्थानकावर झाला गोंधळ

CoronaVirus News : कोरोनामुळे बाप-लेकाची ताटातूट! नवजात बाळाला पाहण्यासाठी 'तो' व्याकूळ झाला पण...

 

Web Title: CoronaVirus Marathi News israel reopening school 261 children infected covid 19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.