CoronaVirus News : तंत्रज्ञानाची कमाल! आता चेहऱ्यावर मशीन लावणार मास्क, Video तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 08:36 AM2020-08-19T08:36:42+5:302020-08-19T08:47:01+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: सुरक्षेच्या दृष्टीने मास्क लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक ठिकाणी मास्क लावणं अनिवार्य करण्यात आलं असून न लावल्यास दंड आकारण्यात आला आहे.

CoronaVirus Marathi News man makes machine that puts masks on peoples face | CoronaVirus News : तंत्रज्ञानाची कमाल! आता चेहऱ्यावर मशीन लावणार मास्क, Video तुफान व्हायरल

CoronaVirus News : तंत्रज्ञानाची कमाल! आता चेहऱ्यावर मशीन लावणार मास्क, Video तुफान व्हायरल

Next

जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या आणि मृतांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे. जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत सात लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दोन कोटींहून अधिक लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. जगातील अनेक देश कोरोनाशी सामना करत आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घराबाहेर पडताना मास्क लावणं आवश्यक आहे. याच दरम्यान मास्कबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने मास्क लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक ठिकाणी मास्क लावणं अनिवार्य करण्यात आलं असून न लावल्यास दंड आकारण्यात आला आहे. बाजारातही विविध प्रकारचे मास्क उपलब्ध आहे. मात्र अनेकांना मास्क लावण्याचा कंटाळा येतो. मात्र आता चेहऱ्यावर मास्क लावणारी मशीन आली आहे. मशीनचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. कोरोनाच्या संकटात मास्क लावणारी मशीन अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. 

अमेरिकेचा बास्केटबॉल खेळाडू रेक्स चेपमॅनने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. 'द करिनेटर' नावाची एक मशीन तयार करण्यात आली असून ती लोकांना मास्क लावते असं कॅप्शनही त्याने व्हिडीओला दिलं आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती मशीन समोर बसली आहे. काही सेकंदात मशीन मास्क हे व्यक्तीच्या दिशेने घेऊन जाते आणि त्याच्या चेहऱ्यावर लावताना दिसत आहे. 

'द करिनेटर' असं नाव या मास्क लावणाऱ्या मशीनला देण्यात आलं आहे. तर एलन पॅन हे व्हिडीओमधील व्यक्तीचं नाव असल्याची माहिती मिळत आहे. एकंदरीत मशीन कशापद्धतीने काम करते, मास्क लावते हे या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलं आहे. लोकांना हा व्हिडीओ आवडला असून तो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अनेकांनी तो शेअर करत त्यावर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

"काँग्रेसने 70 वर्षांत काय केलं?, असा प्रश्न विचारत शहा एम्समध्ये उपचारासाठी दाखल"

CoronaVirus News : आनंदाचा 'चौकार'! कोरोनाच्या संकटात आशेचा किरण, 'या' गोष्टींमुळे देशाला मोठा दिलासा

CoronaVirus News : कर्तव्यनिष्ठेला सलाम! खेड्यापाड्यात पायी प्रवास करून 'हे' डॉक्टर्स करताहेत रुग्णांवर उपचार 

CoronaVirus News : कोरोनाचा धसका! वडिलांचे अंत्यसंस्कार करण्यास मुलाने दिला नकार, शेवटी...

धक्कादायक! तब्बल 4 महिने आईच्या मृतदेहाजवळ बसून होती मुलगी

CoronaVirus News : देशात पहिल्यांदाच कोरोनाग्रस्ताच्या मृतदेहाचं शवविच्छेदन, महत्त्वाची माहिती येणार समोर

बापरे! ...अन् उपमुख्यमंत्र्यांच्या बहिणीने घेतला दुकानदाराचा चावा, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

"राहुल आणि सोनिया गांधी यांनी चीनकडून पैसे घेतले", भाजपा अध्यक्षांचा हल्लाबोल

Web Title: CoronaVirus Marathi News man makes machine that puts masks on peoples face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.