CoronaVirus News : ...अन् पंतप्रधान येताच डॉक्टरांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी केलं असं काही; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 12:59 PM2020-05-19T12:59:06+5:302020-05-19T13:15:08+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी कोरोनाग्रस्तांची सेवा करत असून त्यांचा जीव वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. डॉक्टर आपल्या घरापासून दूर राहून कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत.

CoronaVirus Marathi News medical staff turn backs pm sophi hospital SSS | CoronaVirus News : ...अन् पंतप्रधान येताच डॉक्टरांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी केलं असं काही; Video व्हायरल

CoronaVirus News : ...अन् पंतप्रधान येताच डॉक्टरांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी केलं असं काही; Video व्हायरल

Next

जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत तीन लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर तब्बल 48 लाख लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. अमेरिका, चीन, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोना व्हायरसपासून रुग्णांचा बचाव करता यावा यासाठी सर्वच क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहे. 

वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी कोरोनाग्रस्तांची सेवा करत असून त्यांचा जीव वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. डॉक्टर आपल्या घरापासून दूर राहून कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. बेल्जियमचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये बेल्जियमच्या पंतप्रधान सोफी विल्मेस रुग्णालयाला भेट देण्यासाठी येताच डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी तोंड फिरवल्याचे पाहायला मिळत आहे. 

सुरक्षेसाठी असणारे PPE कीट अनेक ठिकाणी मिळत नाही. त्यामुळे जगभरातील विविध देशांमध्ये सध्या डॉक्टरांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. बेल्जियममध्ये, वैद्यकीय कर्मचार्‍यांना PPE कीट आणि इतर सुरक्षा उपकरणे मिळत नाही आहेत. याचा फटका बेल्जियमच्या पंतप्रधानांना देखील बसला आहे. रुग्णालयातील डॉक्टर-परिचारिका व इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी शांततेत पंतप्रधानांचा निषेध केल्याची घटना समोर आली आहे. 

बेल्जियमच्या पंतप्रधानांनी ब्रुसेल्सच्या सेंट पीटर रुग्णालयाला भेट दिली. त्यावेळी नाराज असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी शांततेत आपला निषेध नोंदवला. पंतप्रधानांचा ताफा रूग्णालयाला भेट देण्यासाठी रूग्णालयाच्या आवारात दाखल होताच वैद्यकीय कर्मचारी पाठ वळवून उभे राहिले. बेल्जियमच्या अनेक पत्रकारांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Lockdown 4.0 : प्रवासासाठी ई-पास काढायचाय?; धावाधाव नको, केंद्राची 'ही' वेबसाईट करेल मदत

CoronaVirus : फक्त 12 दिवसांत देशातील रुग्णांची संख्या दुप्पट; कोरोनाचा धक्कादायक ग्राफ

CoronaVirus : कोरोनाच्या लढ्यात ICMRने रणनीतीत केले मोठे बदल; आता 'या' लोकांचीही होणार चाचणी

CoronaVirus News : X-ray मार्फत कोरोनाचं निदान होणार, फक्त 5 मिनिटांत रिझल्ट मिळणार?

CoronaVirus News : मस्तच! कोरोनाच्या संकटात 'हा' हटके रिस्टबँड फायदेशीर ठरणार; वेळोवेळी सतर्क करणार

CoronaVirus News : आशेचा किरण! जगभरात आठ लसींची वैद्यकीय चाचणी सुरू; WHOची दिलासादायक माहिती

Web Title: CoronaVirus Marathi News medical staff turn backs pm sophi hospital SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.