CoronaVirus News: महिलांच्या तुलनेत पुरुषांना का असतो कोरोनाचा अधिक धोका? समोर आले 'हे' कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 11:45 PM2020-05-11T23:45:08+5:302020-05-11T23:56:43+5:30
युरोपीय हार्ट पत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या या संशोधनातून, महिलांच्या तुलनेत पुरुषांना कोरोनाचा धोका अधिक का आहे, हे समजायलाही मदत मिळू शकते.
एम्सटर्डम : पुरुषांमध्ये एंझाइममुळे कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा धोका अधिक असू शकोत, असे एका नवीन संशोधनातून समोर आले आहे. हा निष्कर्ष हजारो कोरोनाबाधितांवर केलेल्या संशोधनातून समोर आला आहे. या संशोधनात महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या रक्तात एंझियोटेन्सिन कंव्हर्टिंग एंझाइम 2 (एसीई-2)चे केंद्रीकरण अधिक दिसून आले. या एंझाइमच्या माध्यमाने कोरोना व्हायरस पुरुषांच्या स्वस्थ पेशींना संक्रमित करतो.
युरोपीय हार्ट पत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या या संशोधनातून, महिलांच्या तुलनेत पुरुषांना कोरोनाचा धोका अधिक का आहे, हे समजायलाही मदत मिळू शकते. या संशोधनातून हेही समोर आले आहे, की एंझियोटेन्सिन कंव्हर्टिंग एंझाइम (एसीई) इंहिबिटर्स अथवा एंझियोटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर्स (एसीबी) सारख्या औषधाचे सेवन करणाऱ्या हृदय रोग्यांच्या रक्तात एसीई-2 अधिक केंद्रीकरण दिसून आले नाही. नेदरलँडमधील ग्रोनिंगन युनिव्हर्सिटीचे प्रमुख संशोधक अॅड्रियन वूर्स म्हणाले, की आमचा निष्कर्ष कोरोना पीडितांना ही औषधे थांबवण्याचे समर्थन करत नाही.'
काही संशोधनात नुकताच दावा करण्यात आला होता, की ही औषधी घेतल्याने रक्तातील एसीई-2चे केंद्रीकरण वाढते. एड्रियन म्हणाले, 'एसीई-2 पेशींच्या पृष्ठ भागांवर आढळतो. ते कोरोना व्हायरसशी जोडले जाते आणि त्याला स्वस्थ पेशींना संक्रमित करण्याची परवानगी देतो. हे एंझाइम फुफ्फुसात अधिक प्रमाणात असते. यामुळेच, अससे मानले जाते, की कोरोना संबंधित आजार वाढण्यात याची महत्वाची भूमिका असू शकते.'