CoronaVirus News : लढ्याला यश! कोरोना लसीच्या चाचणीनंतर आनंदाची बातमी, 'हा' डोस ठरतोय संजीवनी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 03:01 PM2020-08-27T15:01:25+5:302020-08-27T15:06:19+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरात कोरोनावर संशोधन सुरू आहे. अनेक देशांमध्ये लसीची चाचणी सुरू असून काही ठिकाणी यश आले आहे. कोरोनाच्या या लढ्यात आनंदाची बातमी समोर आली आहे.

CoronaVirus Marathi News moderna corona vaccine generated immune elderly patients | CoronaVirus News : लढ्याला यश! कोरोना लसीच्या चाचणीनंतर आनंदाची बातमी, 'हा' डोस ठरतोय संजीवनी

CoronaVirus News : लढ्याला यश! कोरोना लसीच्या चाचणीनंतर आनंदाची बातमी, 'हा' डोस ठरतोय संजीवनी

Next

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 24,357,067 वर गेली आहे. तर तब्बल 830,150 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. जगभरात कोरोनावर संशोधन सुरू आहे. अनेक देशांमध्ये लसीची चाचणी सुरू असून काही ठिकाणी यश आले आहे. कोरोनाच्या या लढ्यात आनंदाची बातमी समोर आली आहे. अमेरिकेच्या मॉडर्ना कंपनीने तयार केलेल्या कोरोना व्हायरस लसीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 

मॉडर्ना कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीच्या चाचण्यांमध्ये असे कोरोनाची लस वयस्कर रुग्णांमध्येही इम्यून रिस्पॉन्स म्हणजेच रोगप्रतिकारशक्ती निर्माण करते. तसेच 56 ते 70 वर्षांचे 10 रुग्ण आहे 71 हून अधिक वय असलेल्या 10 रुग्णांवर ही चाचणी करण्यात आली आहे. सर्व व्हॉलेंटियर्सना 28 दिवसांच्या फरकाने 100mgचे दोन डोस देण्यात आले असून ते रुग्णांसाठी संजीवनी ठरत असल्याचं म्हटलं जात आहे. 

कंपनीने व्हॉलेंटियर्समध्ये न्यूट्रलायजिंग अँटिबॉडीज सापडल्या. तज्ज्ञांच्या मते, कोरोना व्हायरसच्या इम्यूनिटीसाठी अँटिबॉडीज महत्त्वाच्या आहेत. व्हॉलेंटियर्समध्ये मिळालेल्या अँटिबॉडीज या निरोगी झालेल्या रुग्णांपेक्षा अधिक होत्या अशी माहिती कंपनीने दिली आहे. तसेच चाचणीदरम्यान कोणत्याही रुग्णांवर साइड इफेक्ट झालेले दिसून आले नाहीत. तसेच काही रुग्णांमध्ये डोकेदुखी, थकवा अशी तक्रारी होत्या मात्र हे साइड इफेक्टही दोन दिवसांनंतर दिसले नाही.

अमेरिकेत एकाच वेळी अनेक कोरोना लसीवर काम केले जात आहे. यातच मॉडर्ना लस सर्वात उत्तर लस असल्याचं मानलं जात आहे. मॉडर्ना लसीची फेज 3 चाचणी सुरू झाली आहे. जागतिक आरोग्य संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात एकूण 170 लशींवर सध्या काम सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. भारतातही कोरोनाचा धोका वाढत आहे. रुग्णांची संख्या सातत्याने नवा उच्चांक गाठत असून हादरवणारी आकडेवारी समोर येत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तब्बल 33 लाखांच्या वर गेला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

'चीनसोबत युद्ध झालं तर पाकिस्तानशीही युद्ध निश्चित', पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा

"केंद्र सरकारचा निष्काळजीपणा चिंताजनक"; कोरोना लसीवरून राहुल गांधींचा हल्लाबोल म्हणाले...

पुरावे नष्ट करण्याचा रियाचा प्रयत्न?, सुशांतचं घर सोडण्याआधी 8 हार्ड डिस्कमधला डेटा केला डिलीट

CoronaVirus News : परिस्थिती गंभीर! देशात 10 दिवसांत तब्बल 10,000 जणांचा मृत्यू; कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ

"सोनिया गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसची खोटारडेपणाची फॅक्ट्री सुरू", भाजपाचा हल्लाबोल

 

Web Title: CoronaVirus Marathi News moderna corona vaccine generated immune elderly patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.