CoronaVirus News : कोरोनापेक्षाही भयंकर व्हायरस आला! संक्रमणाचा धोका दहापटीने वाढला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 12:19 PM2020-08-17T12:19:00+5:302020-08-17T12:21:26+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरात कोरोनावर संशोधन सुरू आहे. याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
क्वालालंपूर - जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. जगभरात यावर संशोधन सुरू आहे. याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मलेशियात कोरोना व्हायरसचा नवा प्रकार समोर आला आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हायरस कोरोनापेक्षा 10 पट जास्त धोकादायक आहे. डी 614 जी (D614G) असं या व्हायरसचं नाव असून यामुळे चिंतेत भर पडली आहे.
रिपोर्टनुसार, मलेशियातील एका रेस्टॉरंटच्या मालकामध्ये हा व्हायरस सर्वप्रथम आढळला. रेस्टॉरंटचा मालक भारतातून परत आला होता. त्यामुळे त्याला 14 दिवस क्वारंटाईन होण्यास सांगितले होते. मात्र या व्यक्तीने 14 दिवसांच्या क्वारंटाईनचे उल्लंघन केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पाच महिन्यांची शिक्षा आणि दंड ठोठावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मलेशियामध्ये D614G व्हायरसची 3 प्रकरणं समोर आली आहेत 45 लोकांपैकी तीन जणांमध्ये हा व्हायरस आढळून आला आहे.
CoronaVirus News : बापरे! कोरोनाची लढाई जिंकलेल्या रुग्णांना करावा लागतोय 'या' समस्यांचा सामनाhttps://t.co/t75ozDKBCN#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia
— Lokmat (@MiLOKMAT) August 17, 2020
अमेरिकेच्या डॉ. फॉसी यांनी या व्हायरसमुळे कोरोनाचा प्रसार अधिक वेगाने होऊ शकतो असं म्हटलं आहे. मलेशियाच्या आरोग्य विभागाचे डायरेक्टर जनरल नूर हिशाम अब्दुल्ला यांनी देखील कोरोना व्हायरसच्या या नव्या प्रकारामुळे गंभीर परिणाम पाहायला मिळू शकतात. आतापर्यंत लस तयार करण्यासाठी आणि व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी विकसित करण्यात आलेली नवी पद्धतही यापुढे फेल होऊ शकते. या व्हायरसचा प्रसार हा अनेक देशांमध्येही होऊ शकतो.
CoronaVirus News : कोरोनाचा धसका! मृतदेह नेताना संपूर्ण गाव पाहत होतं पण कोणीही दिला नाही मदतीचा हात..., मन सुन्न करणारी घटनाhttps://t.co/Opd6NLouZO#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia
— Lokmat (@MiLOKMAT) August 17, 2020
मलेशियामध्ये डी 614 जी हा व्हायरस आढळून आल्याने लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच आरोग्य विभागाची देखील चिंता वाढली आहे. मात्र लोकांनी अधिक सावधानता बाळगणे गरजेचं आहे. तरच या व्हायरसवर नियंत्रण मिळवणं शक्य होऊ शकतं असं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. जगभरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येने दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर सात लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णांची संख्या ही 21,824,807 वर पोहोचली आहे. तब्बल 773,032 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
CoronaVirus News : कोरोनाचा विस्फोट होत असताना 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा! https://t.co/hq9srWxObm#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia
— Lokmat (@MiLOKMAT) August 17, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : चिंता वाढली! कोरोनावर मात केल्यानंतरही रुग्णांना गाठावं लागतंय रुग्णालय
CoronaVirus News : आपलेही झाले परके! ...अन् मुलांवर आली वडिलांचा मृतदेह सायकलवरून नेण्याची वेळ
संसदेच्या अॅनेक्स इमारतीमध्ये आग, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश
CoronaVirus News : आनंदाची बातमी! देशात कोरोनाचा उद्रेक होत असताना 'ही' आकडेवारी सुखावणारी