LockdownNews : इम्रान सरकारचं मोठं पाऊल; लॉकडाउन हटविण्याचा घेतला निर्णय, 'असं' सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 10:16 PM2020-05-07T22:16:20+5:302020-05-07T22:26:53+5:30

पाकिस्तानात पाच आठवड्यांसाठी लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. खरेतर, लॉकडाउनचा निर्णय इम्रान सरकारने घेतलाच नव्हता. तर प्रांतातील सरकारे स्वत:च प्रतिबंध लावत होते.

CoronaVirus Marathi News Pakistan to lift lockdown from 9th may despite rising corona cases sna | LockdownNews : इम्रान सरकारचं मोठं पाऊल; लॉकडाउन हटविण्याचा घेतला निर्णय, 'असं' सांगितलं कारण

LockdownNews : इम्रान सरकारचं मोठं पाऊल; लॉकडाउन हटविण्याचा घेतला निर्णय, 'असं' सांगितलं कारण

Next
ठळक मुद्देपाकिस्तानात कोरोनाबाधितांची संख्या आता झपाट्याने वाढत असतानाच इम्रान सरकारने हा निर्णय घेतला आहेपाकिस्तानात पाच आठवड्यांसाठी लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होतीगुरुवारी 1523 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत

इस्लामाबाद - कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी पाकिस्तानात सध्या लॉकडाउन सूरू आहे. मात्र, आता पंतप्रधान इम्रान खान यांनी शनिवारपासून लॉकडाउन उठवण्याची घोषणा केली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, पाकिस्तानात कोरोनाबाधितांची संख्या आता झपाट्याने वाढत असतानाच इम्रान सरकारने हा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात बोलताना इम्रान म्हणाले, लॉकडाउनमुळे गरीब आणि मजुरांचे हाल होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

इम्रान म्हणाले, 'आम्ही लॉकडाउन उठवण्याचा निर्णय घेतला आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच आम्ही हा निर्णय घेत आहोत, हे आम्हाला माहीत आहे. मात्र, जो अंदाज लावला गेला होता त्या तुलनेत आमच्या देशात कोरोनाचा प्रसार होण्याचा वेग कमी आहे.'

आणखी वाचा - CoronaVirus News: धक्कादायक! कोरोनानं आतापर्यंत बदललीयेत शेकडो रुपं, वैज्ञानिकांचे हात अद्यापही रिकामेच

पाकिस्तानात पाच आठवड्यांसाठी लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. खरेतर, लॉकडाउनचा निर्णय इम्रान सरकारने घेतलाच नव्हता. तर प्रांतातील सरकारे स्वत:च प्रतिबंध लावत होते. पाकिस्तानात कोरोनाबाधितांची संख्या 24 हजारांवर पोहोचली आहे. तर 564 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. येथे गुरुवारी 1523 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत आणि असे असतानाच इम्रान सरकारने लॉकडाउन उठवण्याचा निर्णय घेत आहे.

पाकिस्तानात दोन टप्प्यांत लॉकडाउन लागू करण्यात आला होता. लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यात मशिदींमध्ये नमाजसाठी परवानगी देण्यात आली होती. यावर रमजानमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने म्हटले होते. मात्र, या निर्णयानंतर येथील डॉक्टरांनी इम्रान सरकारवर टीकेची झोड उठवली होती.

आणखी वाचा - Lockdown : कोरोना नव्हे, जगभरात 'या' व्हायरसमुळे होणार 14 लाख अधिक मृत्यू

Web Title: CoronaVirus Marathi News Pakistan to lift lockdown from 9th may despite rising corona cases sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.