CoronaVirus News : कोरोनाचा धसका! ...म्हणून 'या' देशात शवपेटीत झोपू लागलेत लोक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 11:00 AM2020-08-24T11:00:41+5:302020-08-24T11:06:56+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: लोकांच्या मनात असलेली कोरोनाबद्दलची भीती दूर करण्यासाठी मार्ग शोधले जात आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे.

CoronaVirus Marathi News people lay coffin japan to overcome fear corona | CoronaVirus News : कोरोनाचा धसका! ...म्हणून 'या' देशात शवपेटीत झोपू लागलेत लोक

CoronaVirus News : कोरोनाचा धसका! ...म्हणून 'या' देशात शवपेटीत झोपू लागलेत लोक

Next

टोकियो - वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाच्या संकटात अनेक धक्कादायक घटना या सातत्याने समोर येत आहे. अनेकांनी कोरोनाचा धसका घेतला आहे. लोकांच्या मनात असलेली कोरोनाबद्दलची भीती दूर करण्यासाठी मार्ग शोधले जात आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. कोरोनाच्या भीतीने लोक शवपेटीत झोपू लागले आहेत. जपानमध्ये कोरोनाची भीती दूर करण्यासाठी एका कंपनीने हा मार्ग शोधला आहे.

कंपनीने एका शोचं आयोजन केलं आहे. लोकांच्या मनात असलेली कोरोना व्हायरसची भीती दूर करणं हा त्यांचा उद्देश आहे. 'स्केअर स्क्वाड' असं या शोचं नाव असून हा 15 मिनिटांचा शो आहे. यामध्ये दोन मीटर लांबीच्या एका बॉक्समध्ये जिवंत माणसांना एखाद्या मृतदेहाप्रमाणे शवपेटीत झोपवलं जातं. त्यांना भीतीदायक अशा गोष्टी ऐकवल्या जातात. शवपेटीत असलेली व्यक्ती अभिनेत्यांना अभिनय करताना पाहू शकते. काही नकली हातांचा तुम्हाला स्पर्श होऊ शकतो किंवा तुमच्यावर पाण्याचा फवाराही केला जाऊ शकतो. 

प्रोडक्शन कंपनी कोवागसेटाईचे कोऑर्डिनेटर केंटा इवाना यांनी दिलेल्या माहितीनुसार, "स्केअर स्क्वाड या 15 मिनिटांच्या शोमुळे कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थिती लोकांना मोठ्याने ओरडण्याची संधी मिळते. ज्यामुळे त्यांना थोडं बरं वाटेल अशी  आशा आहे." कोरोनामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे लोकांना रोजगारदेखील नाही. 

केंटा इवाना यांना देखील आपल्या अभिनेत्यांच्या कामाबाबत चिंता वाटत आहे. याआधी ते थीम पार्कसारख्या ठिकाणी प्रदर्शन करायचे. मात्र कोरोनामुळे थीम पार्कही बंद झालेत त्यामुळे या कलाकारांना काम मिळणं बंद झालं आहे. लोक सध्या नव्या गोष्टींच्या शोधात आहे आणि कोरोनाची भीती दूर करण्याचीही गरज असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. शो मध्ये सहभागी झालेल्या काही लोकांनी हा शो चांगला असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : कौतुकास्पद! पुराच्या पाण्यात होडी झाली रुग्णवाहिका, पोलिसांनी केली रुग्णांसाठी व्यवस्था

CoronaVirus News : रशियानंतर 'या' देशाने तयार केली कोरोना लस; आपत्कालीन स्थितीत 2 लसींना मंजुरी

CoronaVirus News : टीव्ही-चित्रपटाच्या शूटिंगसाठी केंद्र सरकारची नवी नियमावली जारी, 'या' गोष्टी असणार अनिवार्य

'दाऊदला कोणत्याही परिस्थितीत भारतात आणा', रोहित पवारांनी मोदींकडे केली मागणी

CoronaVirus News : स्वत:वर कोरोना लसीची चाचणी करायचीय?, 'या' आहेत अटी, जाणून घ्या नेमकं कसं असणार?

Web Title: CoronaVirus Marathi News people lay coffin japan to overcome fear corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.