CoronaVirus News : बापरे! क्वारंटाईन सेंटरमध्ये सेक्स रॅकेट; अनेकांना कोरोनाची लागण, घटनेने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 12:48 PM2020-07-03T12:48:49+5:302020-07-03T12:50:09+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना रूग्ण आणि संशयितांसाठी असलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये सेक्स रॅकेट सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून मोठ्या संख्येने लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. 

CoronaVirus Marathi News quarantine hotel sex scandal linked corona outbreak australia | CoronaVirus News : बापरे! क्वारंटाईन सेंटरमध्ये सेक्स रॅकेट; अनेकांना कोरोनाची लागण, घटनेने खळबळ

CoronaVirus News : बापरे! क्वारंटाईन सेंटरमध्ये सेक्स रॅकेट; अनेकांना कोरोनाची लागण, घटनेने खळबळ

googlenewsNext

मेलबर्न - जगभरातील अनेक देश कोरोनाचा सामना करत आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 524,188 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर एक कोटीहून अधिक लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या 10,992,462 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे 6,152,481 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 

कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे अनेक ठिकाणी इमारती, हॉटेल्स यांचं रुपांतर क्वारंटाईन सेंटरमध्ये करण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये कोरोनाच्या संक्रमणाची विचित्र घटना समोर आली आहे. कोरोना रूग्ण आणि संशयितांसाठी असलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये सेक्स रॅकेट सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून मोठ्या संख्येने लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. 

मेलबर्नमधील काही हॉटेल्स हे क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरले जात आहेत. मात्र आता या हॉटेल्समध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याचं समोर आलं आहे. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमधील हॉटेलमध्ये परदेशातून येणाऱ्या लोकांना ठेवण्यात आलं होतं. मात्र या हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट सुरू करण्यात आलं. यातूनच अनेकांना कोरोनाची लागण झाली. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. 

मे आणि जूनच्या सुरुवातीला झालेल्या कोरोना संसर्गाची सर्वाधिक प्रकरणे या सेक्स रॅकेटमुळे आढळून आली. कोरोनामुळे ऑस्ट्रेलियामधील नागरिक आणि कायमस्वरुपी रहिवाशांना देशात प्रवेश करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियात आल्यावर त्याला 14 दिवस क्वारंटाईन राहण्याचा नियम आहे. यासाठी अनेक हॉटेल्समध्ये क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियामध्ये येत्या काही दिवसांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

रुग्णालयाचा निष्काळजीपणा! डॉक्टरने घरबसल्या VCवरून दिल्या सूचना, कंपाऊंडरने केलं डायलेसिस अन्...

CoronaVirus News : नवा उच्चांक! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ; हादरवणारी आकडेवारी

"नातीने आजीचं नाक कापलं"; परेश रावल यांचा प्रियंका गांधींवर हल्लाबोल

CoronaVirus News : 'या' रुग्णांसाठी होम आयसोलेशन नाही; आरोग्य मंत्रालयाने बदलले नियम

बारा रुपये दराने पेट्रोल खरेदी गेले अन् 12 वाजले; पाहा नेमके काय घडले

"चीनच्या आक्रमकतेसमोर झुकणार नाही हे भारताने दाखवून दिलं"

Web Title: CoronaVirus Marathi News quarantine hotel sex scandal linked corona outbreak australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.