CoronaVirus : खूशखबर! जगातली पहिली कोरोना लस ऑगस्‍टमध्ये येणार, 'हा' देश 3 कोटी डोस बनवणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 06:21 PM2020-07-16T18:21:59+5:302020-07-16T18:29:46+5:30

यासंदर्भात रशियाने दावा केला आहे, की मॉस्को स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीने जगातील पहिल्या कोरोना व्हायरस लसीसाठी क्लिनिकल ट्रायल यशस्वीपणे पूर्ण केली आहे. कोरोना व्हायरसवरील जगातील पहिली लस ऑगस्ट महिन्यात लाँच होईल.

CoronaVirus Marathi News Russia to make 3 million corona vaccine doses world first vaccine to be launched in August | CoronaVirus : खूशखबर! जगातली पहिली कोरोना लस ऑगस्‍टमध्ये येणार, 'हा' देश 3 कोटी डोस बनवणार 

CoronaVirus : खूशखबर! जगातली पहिली कोरोना लस ऑगस्‍टमध्ये येणार, 'हा' देश 3 कोटी डोस बनवणार 

googlenewsNext

मॉस्‍को - कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. सर्वच देश कोरोनाची लस केव्हा बाजारात येते, याकडे डोळे लावून बसले आहेत. यातच आता रशियाने या वर्षी स्थानिक पातळीवर प्रायोगिक कोरोना लसीचे तीन कोटी डोस तयार करण्याची योजना आखत आहे. यापैकी 1 कोटी 70 लाख डोस परदेशात निर्माण करण्याची क्षमता आहे. रशियाने काही दिवसांपूर्वीच, 'आम्ही कोरोना व्हायरसवरील लस तयार करण्याच्या दृष्टीने मानवी चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली आहे, अशी घोषणा केली होती. यामुळे, कोरोना लस तयार करण्याच्या शर्यतीत आता रशिया इतर देशांच्या तुलनेत फार पुढे गेला आहे. 

सर्वात पहिले लस देण्याचा दावा -
रशियन वैज्ञानिकांनी दावा केला आहे, की कोरोना व्हायरसवरील जगातील पहिली लस ऑगस्ट महिन्यात लाँच होईल. गॅमेलेई नॅशनल रिसर्च सेन्टर फॉर एपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीचे संचालक अलेक्झॅन्डर गिंट्सबर्ग यांनी सांगितले, कोरोना लस 12 ते 14 ऑगस्टपर्यंत लोकांना द्यायला सुरुवात होईल. मॉस्को टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, ते म्हणाले, की सप्टेंबर महिन्यापासून खासगी कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर या लसीचे उत्पादन सुरू होण्याची शक्यता आहे.

यासंदर्भात रशियाने दावा केला आहे, की मॉस्को स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीने जगातील पहिल्या कोरोना व्हायरस लसीसाठी क्लिनिकल ट्रायल यशस्वीपणे पूर्ण केली आहे. इंस्टीट्यूट फॉर ट्रान्सलेशन मेडिसिन अँड बायोटेक्नोलॉजीचे संचालक वादिम तरासोव म्हणाले होते, व्हॉलंटियर्सच्या पहिल्या बॅचला 15 जुलै आणि दुसऱ्या बॅचला 20 जुलैला सुट्टी देण्यात येईल. क्लिनिकल ट्रायल्स गॅमेलेई नॅशनल रिसर्च सेन्टर फॉर एपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीमध्ये 18 जूनपासूनच सुरू करण्यात आले होते.

लवकरच बाजारात येणार व्हॅक्सीन -
सेचेनोव्ह यूनिव्हर्सिटीने म्हटले आहे, की इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल पॅरासिटोलॉजी आणि ट्रॉपिकल अँड व्हेक्टर-बॉर्न डिसिजचे संचालक अलेक्झँडर लुकाशेव यांच्या मते, या संपूर्ण संशोधनाचा हेतू, मानवी आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी कोविड-19वरील लस यशस्वीपणे तयार करणे होता. लुकाशेव यांनी सांगितले होते, की सुरक्षिततेच्या दृष्टाने या लसीच्या पूर्णपणे तपासणी करण्यात आली आहे. तसेच लोकांच्या सुरक्षिततेसाठी ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. 

ड्रग्ज सारख्या महत्वपूर्ण उत्पादनांच्या निर्मितीसाठीही विद्यापीठ सक्षम -
तारसोव म्हणाले होते, सेचेनोव्ह विद्यापीठाने केवळ एक शैक्षणिक संस्था म्हणूनच नाही, तर एक वैज्ञानिक आणि टेक्निकल रिसर्च केंद्र म्हणूनही कौतुकास्पद काम केले आहे. महामारीच्या परिस्थितीत ड्रग्ज सारख्या महत्वपूर्ण आणि जटिल उत्पादनांच्या निर्मितीसाठीही हे विद्यापीठ सक्षम आहे. 

महत्त्वाच्या बातम्या -

रशियाचं नवं 'ब्रह्मास्त्र' S-500, आकाशात उपग्रहांचाही करेल खात्मा

CoronaVirus News: चिंताजनक!; कोरोनाने सर्व विक्रम मोडले, 24 तासांत 606 जणांचा मृत्यू; महाराष्ट्राची स्थिती गंभीर

गुडन्यूज! : अमेरिकेची लस अखेरच्या टप्प्यात; निकालानंतर वैज्ञानिकही आनंदात

"चीनकडून लाच घेतायत नेपाळचे पंतप्रधान ओली, स्विस बँकेच्या खात्यात ठेवले आहेत कोटीच्या कोटी"

...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप

खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा

Web Title: CoronaVirus Marathi News Russia to make 3 million corona vaccine doses world first vaccine to be launched in August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.