CoronaVirus : झक्कास बातमी!; रशियाने तयार केली कोरोना लस; सर्व चाचण्याही यशस्वी झाल्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 04:11 PM2020-07-12T16:11:13+5:302020-07-12T16:13:57+5:30
मॉस्को - कोरोना व्हॅक्सीनवर रशियाने बाजी मारली आहे. रशियातील सेचेनोव्ह विद्यापीठाने कोरोनावरील व्हॅक्सीन तयारकेली असल्याचा दावा केला आहे. ...
मॉस्को - कोरोना व्हॅक्सीनवर रशियाने बाजी मारली आहे. रशियातील सेचेनोव्ह विद्यापीठाने कोरोनावरील व्हॅक्सीन तयारकेली असल्याचा दावा केला आहे. विद्यापीठाने म्हणटले आहे, की या व्हॅक्सीनचे सर्व प्रकारचे परीक्षण यशस्वीपणे पार पडले आहेत. विद्यापीठाचा हा दावा सत्य सिद्ध झाला, तर ही कोरोना व्हायरसवरील जगातली पहिली व्हॅक्सीन ठरेल. अमेरिकेसह जगातील अनेक विकसित देश कोरोनावर व्हॅक्सीन तयार करण्यासाठी दिवस-रात्र एक करत आहेत. अनेक जण ट्रायलदरम्यान अयशस्वीही झाले आहेत. मात्र, रशियाने पहली व्हॅक्सीन यशस्वी झाल्याचा दावा करत बाजी मारली आहे.
18 जूनलाच सुरू झाले होते व्हॅक्सीनचे परीक्षण -
इंस्टिट्यूट फॉर ट्रान्सलेशनल मेडिसिन अँड बायोटेक्नॉलॉजीचे संचालक वदिम तरासोव यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठाने 18 जूनलाच रशियाच्या गेमली इंस्टिट्यूट ऑफ अॅपिडेमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीने तयार केलेल्या व्हॅक्सीनच्या परीक्षणाला सुरूवात केली होती. तारासोव म्हणाले, सेचेनोव्ह विद्यापीठाने कोरोनो व्हायरसविरोधातील जगातील पहिल्या व्हॅक्सीनचे स्वयं सेवकांवरील परीक्षण यशस्वीपणे पूर्ण केले आहे.
लवकरच बाजारात येणार व्हॅक्सीन -
सेचेनोव्ह यूनिव्हर्सिटीने म्हटले आहे, की इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल पॅरासिटोलॉजी आणि ट्रॉपिकल अँड वेक्टर-बॉर्न डिसिजचे संचालक अलेक्झँडर लुकाशेव यांच्या मते, या संपूर्ण संशोधनाचा हेतू, मानवी आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी कोविड-19वरील व्हॅक्सीन यशस्वीपणे तयार करणे होता. लुकाशेव यांनी स्पुतनिकला सांगितले, की सुरक्षिततेच्या दृष्टाने या व्हॅक्सीनच्या सर्व बाबींची तपासणी केली आहे. तसेच लोकांच्या सुरक्षिततेसाठी ही व्हॅक्सीन लवकरच बाजारात उपलब्ध होईल.
ड्रग्ज सारख्या महत्वपूर्ण उत्पादनांच्या निर्मितीसाठीही विद्यापीठ सक्षम -
तारसोव म्हणाले, सेचेनोव्ह विद्यापीठाने केवळ एक शैक्षणिक संस्था म्हणूनच नाही, तर एक वैज्ञानिक आणि टेक्निकल रिसर्च केंद्र म्हणूनही कौतुकास्पद काम केले आहे. महामारीच्या परिस्थितीत ड्रग्ज सारख्या महत्वपूर्ण आणि जटिल उत्पादनांच्या निर्मितीसाठीही हे विद्यापीठ सक्षम आहे. तसेच ते म्हणाले, परीक्षणातील स्वयंसेवकांच्या दुसऱ्या गटाला 20 जुलैला सुट्टी देण्यात येईल.
अमेरिकेच्या मॉडर्नाचीही घोषणा -
जगभरात अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरस व्हॅक्सीनचे परिक्षण सुरू असतानाच अमेरिकन बायोटेक कंपनी मॉडर्नाने आपल्या व्हॅक्सीनचे अखेरचे परीक्षण जुलै महिन्यात करण्याची घोषणा केली होती. ही कंपनी परीक्षणाच्या अखेरच्या टप्प्यात पोहोचली असून 30 हजार जणांवर कोरोना व्हायरस व्हॅक्सीन देण्याची योजना आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
CoronaVirus : आता उत्तर प्रदेशात लॉकडाउनचा नवा फॉर्म्युला, असा आहे योगी सरकारचा 'प्लॅन'
CoronaVirus : मोलकरणीच्या नावानं पाठवलं पत्नीचं Corona सॅम्पल, रिपोर्ट आला पॉजिटिव्ह!; मग...
धक्कादायक! : हनीट्रॅप अन् 9 कोटी 'हेर'; धूर्त चीन अशी करतो जगाची 'हेरगिरी'
खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा
ड्रॉप होऊ शकते कोरोना व्हॅक्सीनची तिसरी ट्रायल? ICMRच्या वरिष्ठ वैज्ञानिकानं दिलं असं उत्तर