CoronaVirus News : 'ड' जीवनसत्त्वामुळे कोरोनावर करता येते मात?, शास्त्रज्ञ म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 11:18 AM2020-05-21T11:18:28+5:302020-05-21T11:25:27+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत.
लंडन - जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 329,735 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 50 लाखांहून अधिक लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या 5,090,118 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे 2,024,286 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत.
कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा संसर्ग आणि उपचाराबाबत नवनवीन दावे करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी 'ड' जीवनसत्त्वामुळे कोरोनावर मात करता येईल असा दावा करण्यात येत होता. मात्र आता हा दावाच दिशाभूल करणारा असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. युनिर्व्हसिटी ऑफ ब्रिगटनचे प्राध्यापक कॉलिन स्मिथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर अनेक दावे करण्यात येत आहेत. ड जीवनसत्त्वामुळे कोरोनावर मात करता येऊ शकते असाही दावा करण्यात येत आहे. मात्र, यात काहीही तथ्य नाही.
कुटुंब रुग्णालयात एकत्र झालं दाखल पण घरी परतली फक्त आई; मन सुन्न करणारी घटनाhttps://t.co/QxyBWbxTCQ#Hospital#MadhyaPradesh
— Lokmat (@MiLOKMAT) May 21, 2020
स्मिथ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी याबाबत एक लेख देखील लिहीला आहे. त्यामध्ये लॉकडाऊनच्या काळात सूर्याच्या कोवळ्या उन्हातून, आहारातून जीवनसत्त्व ड मिळवणे कठीण झाले आहे. हाडे आणि मांसपेशींनी मजबूत करण्यासाठी ड जीवनसत्त्वाची आवश्यकता असते. तसेच रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढते असं ब्रिटनच्या या संशोधकांनी म्हटलं आहे. मात्र त्यांनी ड जीवनसत्त्व आणि कोरोना यांच्यात संबंध नसल्याचे म्हटले आहे. जीवनसत्त्व ड अधिक प्रमाणात घेतल्यामुळे कोरोनाला दूर ठेवता येईल याबाबत काहीही पुरावा नसल्याचे त्यांनी म्हटले. या उलट जीवनसत्त्व ड अधिक प्रमाणात घेतल्यास आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याबाबतचे पुरावे असल्याचे त्यांनी म्हटले.
Cyclone Amphan : पश्चिम बंगालमध्ये 'अम्फान'चे थैमान! अनेकांचा मृत्यू, कोट्यवधीचं नुकसानhttps://t.co/CdCuuB2lpO#AmphanCyclon#AmphanSuperCyclone
— Lokmat (@MiLOKMAT) May 21, 2020
CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात भूतदया! हेच असतं आईचं प्रेम; फोटो व्हायरलhttps://t.co/9QsOYraMhx#CoronaUpdatesInIndia#CoronaLockdown
— Lokmat (@MiLOKMAT) May 21, 2020
महत्त्वाच्या बातम्या
कुटुंब रुग्णालयात एकत्र झालं दाखल पण घरी परतली फक्त आई; मन सुन्न करणारी घटना
CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात भूतदया! हेच असतं आईचं प्रेम; फोटो व्हायरल
Cyclone Amphan : पश्चिम बंगालमध्ये 'अम्फान'चे थैमान! अनेकांचा मृत्यू, कोट्यवधीचं नुकसान
CoronaVirus News : कोरोनाग्रस्ताच्या मृतदेहात किती वेळ जिवंत राहतो व्हायरस?; ICMR ने दिलं उत्तर
CoronaVirus News : ...म्हणून मजुरांना आपल्या राज्यापेक्षा केरळ वाटतंय जास्त सुरक्षित