CoronaVirus : वैज्ञानिकांनी कोरोना टेस्टसाठी शोधून काढले नवे तंत्र, फक्त 36 मिनटांत रिपोर्ट हातात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 06:55 PM2020-07-27T18:55:32+5:302020-07-27T19:00:39+5:30
सध्या कोविड-19 च्या चाचणीसाठी ‘पॉलीमरेज चैन रिअॅक्शन (पीसीआर) नावाची एक सर्वात संवेदनशील पद्धत आहे. यात एक मशीन व्हायरल आनुवांशिक कणांना वारंवार कॉपी करून त्याची तपासणी करते. हिच्या सहाय्याने सार्स-सीओवी-2 व्हायरसच्या कुठल्याही लक्षणांची माहिती मिळू शकते.
सिंगापूर - कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत लाखो लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर लाखो लोकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. कोरोना व्हायरसची तपासणी, त्यावरील औषध, लस आणि त्यामुळे भविष्यात काय परिणाम होऊ शकतात, यासंदर्भात सर्वच देशांत सातत्याने संसोधन सुरू आहे. यातच आता सिंगापूर येथील काही वैज्ञानिकांनी एक असे तंत्र विकसित केले आहे. ज्याच्या सहाय्याने, आता प्रयोगशाळेत होणाऱ्या कोविड-19 च्या चाचणीचा अहवाल केवळ 36 मिनिटांतच समोर येईल. सध्या चाचणीसाठी उच्च प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची आवश्यकता लागते आणि निकाल यायलाही बराच वेळ लागतो.
नानयांग टेक्नोलॉजिकल युनिव्हर्सिटी (एनटीसी)च्या ‘ली कांग चियान स्कूल ऑफ मेडिसिन’मध्ये वैज्ञानिकांनी हे तंत्र विकसित केले आहे. यात ‘‘कोविड-19 च्या प्रयोगशाळेतील चाचणीसाठी लागणारा वेळ आणि खर्चात सुधारणा करण्यासंदर्भातील पद्धती’’ सुचवण्यात आल्या आहेत.
नव्या तंत्राच्या सहाय्याने केवळ 36 मिनिटांत येईल अहवाल -
वैज्ञानिकांनी सांगितले, की जे परीक्षण पोर्टेबल उपकरणांच्या माध्यमाने केले जाऊ शकते, ते समुदायात एका ‘स्क्रिनिंग टूल’च्या स्वरुपातही सुरू केले जाऊ शकते. या नव्या तंत्राने कोविड-19 च्या प्रयोगशाळेतील तपासणीचा अहवाल 36 मिनिटांत येऊ शकतो.
सध्या कोविड-19 च्या चाचणीसाठी ‘पॉलीमरेज चैन रिअॅक्शन (पीसीआर) नावाची एक सर्वात संवेदनशील पद्धत आहे. यात एक मशीन व्हायरल आनुवांशिक कणांना वारंवार कॉपी करून त्याची तपासणी करते. हिच्या सहाय्याने सार्स-सीओवी-2 व्हायरसच्या कुठल्याही लक्षणांची माहिती मिळू शकते.
आरएनएच्या तपासणीत लागतो अधिक वेळ -
आरएनएच्या चाचणीत सर्वाधिक वेळ लागतो. या चाचणीत संक्रमित व्यक्तीच्या नुमुन्यातून आरएनए वेगळा केला जातो. या प्रक्रियेसाठी ज्या रासायनिक घटनकांची आवश्यकता असते त्याचा पुरवठा जगात फार कमी आहे.
‘एनटीयू एलकेसीमेडिसन’ने विकसित केलेले नवे तंत्र अनेक टप्प्यांना एकमेकांशी जोडते. एवढेच नाही, तर याच्या सहाय्याने रुग्णाच्या नमुन्यांची सरळ तपासणी केली जाते. या पद्धतीत अहवाल तर लवकर येतोच, शिवाय आरएनए शोधण्यासाठी आवश्यक असलेल्या रसायनांची आवश्यकताही लागत नाही. या नव्या तंत्राची सविस्तर माहिती साइंटिफिक जनरल ‘जीन्स’मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
राजस्थान संकट : सलोख्याचे संकेत?; सचिन पायलटांच्या फेसबुक पोस्टवर पुन्हा दिसला काँग्रेसचा 'हात'
भारताचा चीनवर दुसरा डिजिटल स्ट्राईक; एकाच झटक्यात पुन्हा 47 अॅप्सवर बंदी!
आई शप्पथ, एवढं बील! : भज्जीच्या घराचं वीज बील पाहून व्हाल अवाक; म्हणाला...
भारत-इस्रायलची कमाल!; आता फक्त आवाज अन् श्वासावरून मिळणार कोरोना चाचणीचा अहवाल
100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर