CoronaVirus News: कोरोना व्हॅक्सीनचे क्लिनिकल ट्रायल यशस्वी, चीनी कंपनीचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 09:23 AM2020-06-15T09:23:38+5:302020-06-15T09:28:43+5:30
येथील वुहान इंस्टिट्यूट आणि पेइचिंग इंस्टिट्यूट वेगवेगळ्या व्हॅक्सीनच्या उत्पादनासाठी प्लांटचा विस्तार करत आहेत. या व्हॅक्सीनच्या ट्रायलसाठी 18 ते 59 वर्ष वयोगटातील 743 स्वस्थ स्वयंसेवकांची नाव नोंदणी केली होती.
पेइचिंग : कोरोना व्हायरसवरील व्हॅक्सीन तयार करणारी चीनी कंपनी सिनोव्हॅक बायोटेकने दावा केला आहे, की त्यांची कोरोनाव्हॅक व्हॅक्सीन क्लिनिकल ट्रायलच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यावरील प्राथमीक निकालात यशस्वी ठरली आहे. येथील वुहान इंस्टिट्यूट आणि पेइचिंग इंस्टिट्यूट वेगवेगळ्या व्हॅक्सीनच्या उत्पादनासाठी प्लांटचा विस्तार करत आहेत.
बिजिंग येथील या कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे, की ही व्हॅक्सीन रोग प्रतिकार शक्ती वाढवते. या व्हॅक्सीनच्या ट्रायलसाठी 18 ते 59 वर्ष वयोगटातील 743 स्वस्थ स्वयंसेवकांची नाव नोंदणी केली होती.
'रुग्णांवर कसल्याही प्रकारचा साइडइफेक्ट नाही' -
या निवेदनात म्हणण्यात आले आहे, की 143 लोकांवर पहिल्या तर 600 लोकांवर दुसऱ्या टप्प्यात परीक्षण करण्यात आले. परीक्षणात भाग घेतलेल्या लोकांना दोन इंजक्शन देण्यात आले. आणि 14 दिवसांनंतर त्यांच्यात कुठल्याही प्रकारचे साइडइफेक्ट दिसून आले नाही. या कंपनीने आशाव्यक्त केली आहे, की यासंदर्भात दुसऱ्या टप्प्यावरील परीक्षणाचा अहवाल आणि तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षणासंदर्भातील प्रोटोकॉल चीनच्या राष्ट्रीय वैद्यकीय उत्पादन प्रशासनाला (एमएमपीए) सोपवला जाईल.
कोरोनाविरोधात मोठ्या यशाचा दावा -
सिनोव्हॅकचे अध्यक्ष आणि सीईओ वेइदोंग यीन यांनी म्हटले आहे, की आमच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यावरील परीक्षणातून स्पष्ट झाले आहे, की कोरोनाव्हॅक सुरक्षित आहे आणि ती रोगप्रतिकारशक्ती वाढवू शकते. क्लिनिकल ट्रायलचा पहिल्या आणि दुसरा टप्पा पूर्ण होणे, म्हणजे आम्ही कोरोनाविरोधातील लढाईत मैलाचा दगड पार केला आहे.
दिलासादायक! कोरोना होतोय हद्दपार; 'या' 26 देशांमध्ये आता एकही रुग्ण नाही