CoronaVirus News : टाईम्स स्क्वेअरवर लागलं 'ट्रम्प डेथ क्लॉक'; 'हे' आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 09:17 AM2020-05-14T09:17:49+5:302020-05-14T09:27:49+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनापुढे अमेरिकेसारखा मोठा देशही हतबल झाला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे.
न्यूयॉर्क - कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे आहे. जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. अमेरिका, चीन, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 298,165 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 4,429,235 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 1,658,995 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे.
कोरोनापुढे अमेरिकेसारखा मोठा देशही हतबल झाला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील टाइम्स स्केअर येथे एक नवा बिलबोर्ड लावण्यात आला आहे. 'ट्रम्प डेथ क्लॉक' असं त्याला नाव देण्यात आलं असून सर्वत्र याच क्लॉकची चर्चा रंगली आहे. बिलबोर्डवर सरकारी निष्काळजीपणामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या लावण्यात आली आहे. चित्रपट निर्माते यूजीन जेर्की यांनी हे ट्रम्प डेथ क्लॉक डिझाईन केलं आहे. तसेच कोरोना व्हायरसचा संसर्ग पसरल्यानंतर योग्य ती काळजी न घेतल्याने ज्यांना आपला जीव गमवावा लागला त्या मृतांचा आकडा मोजण्याचे काम हे घड्याळ करत आहे.
अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. अमेरिकेतील कोरोनाबधितांचा आकडा दहा लाखांहून अधिक झाला आहे. अमेरिकेतील परिस्थिती दिवसेंदिवस कोरोनामुळे गंभीर होत चालली आहे. अमेरिकेत गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 1 हजार 813 लोकांचा मृत्यू झाला. जॉन हॉपकिंस युनिव्हर्सिने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत गेल्या 24 तासांत तब्बल 1813 लोकांचा मृत्यू झाला असून आतापर्यंतचा हा मोठा आकडा आहे. अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांची संख्या 1,430,348 झाली असून आतापर्यंत 85,197 जणांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी योग्यवेळी योग्य निर्णय घेतले असते तर अनेकांचे जीव वाचले असते असं देखील यूजीन जेर्की यांनी म्हटलं आहे. लॉकडाऊनमुळे अमेरिकेत जवळपास तीन कोटींहून अधिक लोक बेरोजगार झाल्याने ट्रम्प प्रशासन राज्यांतील व्यवहार सुरू करण्यावर भर देत आहे. अमेरिकेतील राज्य आणि शहरांतील कोरोना विषाणूंचा फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे निर्बंध हटविण्याची घाई केल्यास कोविड-19 ने अधिक लोकांचा मृत्यू होईल, तसेच मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानही होईल, असा स्पष्ट इशारा अमेरिकी सरकारचे वरिष्ठ संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. अॅन्थोनी फॉसी यांनी दिला आहे. खरा धोका हा आहे की, या संसर्गजन्य रोगाचा फैलाव एवढा होईल की, तो आटोक्यात आणणे कठीण होईल, असा इशारा डॉ. फॉसी यांनी संसदीय समिती आणि अमेरिकेला दिला आहे.
CoronaVirus News : त्यांचा तो प्रवास ठरला अखेरचा! गावाकडे निघालेल्या 8 मजुरांचा मृत्यू, 50 जण जखमीhttps://t.co/cX0QCg1ETq#CoronaUpdatesInIndia#coronalockdown#accident
— Lokmat (@MiLOKMAT) May 14, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : त्यांचा तो प्रवास ठरला अखेरचा! गावाकडे निघालेल्या 8 मजुरांचा मृत्यू, 50 जण जखमी
शाओमीचे सीईओ कोणता फोन वापरतात माहित्येय?; नेटकऱ्यांनी एका पोस्टमधून काढलं शोधून
CoronaVirus News : 'झिंक आणि गरम पाण्याने कोरोनाग्रस्त बरे झाले', डॉक्टरचा दावा
देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी उल्लेख केलेलं 'Y2K' नेमकं आहे तरी काय?
CoronaVirus News : बापरे! ज्याच्या घरात चोरी केली तोच निघाला कोरोना पॉझिटिव्ह; मग...
CoronaVirus News : रिक्षातून केला तब्बल 1500 किमीचा प्रवास पण घरजवळ येताच...; मन सुन्न करणारी गोष्ट
CoronaVirus News : मंत्री शिंकले, सगळेच घाबरले अन् पुढे झालं असं काही...