CoronaVirus News : परिस्थिती गंभीर! 'या' देशात कोरोनाचा उद्रेक, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 12:18 PM2020-07-28T12:18:52+5:302020-07-28T12:20:07+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे.
कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे आहे. जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. अमेरिका, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 16,643,498 वर गेली असून 656,621 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर आतापर्यंत 10,231,837 लोकांनी कोरोनावर मात केली आहे.
कोरोनापुढे अमेरिकेसारखा मोठा देशही हतबल झाला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. रॉबर्ट ओ ब्रायन (Robert O'Brien) यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, रॉबर्ट ओ ब्रायन यांनी चाचणीचा रिपोर्ट आल्यावर स्वत:ला आयसोलेट केलं आहे. ते कोणाच्याच संपर्कात आले नव्हते.
US National Security Advisor Robert O'Brien tests positive for COVID-19: US media
— ANI (@ANI) July 27, 2020
(file pic) pic.twitter.com/5dYNkekOFk
अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. अमेरिकेतील कोरोनाबधितांचा आकडा 42 लाखांहून अधिक झाला आहे. अमेरिकेतील परिस्थिती दिवसेंदिवस कोरोनामुळे गंभीर होत चालली आहे. अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून आतापर्यंत 1 लाख 46 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. जगभरात तब्बल एक कोटी लोकांनी कोरोनावर मात केली आहे. 10,231,837 जणांनी कोरोनाविरुद्धचं युद्ध जिंकलं आहे.
CoronaVirus News : कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी औषधं ठरताहेत प्रभावी पण...https://t.co/m6d6ZNccX8#coronavirus#CoronaUpdates#COVID19#WHO
— Lokmat (@MiLOKMAT) July 28, 2020
कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला असून अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जगभरातील सर्वच देश या संकटाचा सामना करत असून कोरोनाचा उद्रेक झालेला पाहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे बरं होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण देखील सातत्याने वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
CoronaVirus News : धोका वाढला! कोरोनामुळे परिस्थिती गंभीरhttps://t.co/JOqHJYcLJx#coronavirus#CoronaUpdates#COVID19#WHO
— Lokmat (@MiLOKMAT) July 28, 2020
महत्त्वाच्या बातम्या
सप्तपदीनंतर नवरा-नवरी पोहोचले थेट पोलीस ठाण्यात; कारण ऐकून तुम्हीही कराल भरभरून कौतुक
CoronaVirus News : मोठं यश! कोरोनाला रोखणारी 21 औषधं सापडली; शास्त्रज्ञांचा दावा
CoronaVirus News : चिंताजनक! 6 आठवड्यात कोरोनाग्रस्तांमध्ये दुप्पट वाढ; WHOने बोलावली इमर्जन्सी बैठक
CoronaVirus News : लढ्याला यश! फक्त 400 रुपयांत होणार कोरोना टेस्ट, एका तासात येणार रिपोर्ट
CoronaVirus News : कडक सॅल्यूट! जंगलातून रस्ता पार करत 'ही' नर्स लोकांपर्यंत पोहचवते मोफत औषधं