CoronaVirus News : ट्रम्प यांचा 'हा' लूक पाहिलात का?, पहिल्यांदाच लावला मास्क अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 12:27 PM2020-07-12T12:27:06+5:302020-07-12T12:45:51+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे.
कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे आहे. जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. अमेरिका, चीन, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनापुढे अमेरिकेसारखा मोठा देशही हतबल झाला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे.
अमेरिकेतील कोरोनाबधितांचा आकडा 33 लाखांहून अधिक झाला आहे. अमेरिकेतील परिस्थिती दिवसेंदिवस कोरोनामुळे गंभीर होत चालली आहे. कोरोनाच्या संसर्गात मास्क लावणं अत्यंत महत्तवाचं असून तो लावण्याचा सल्ला दिला जात आहे. देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मास्क शिवाय सर्वत्र हजेरी लावत होते. मात्र आता ट्रम्प यांचा मास्क लूक समोर आला आहे. पहिल्यांदाच ट्रम्प यांनी मास्क लावलेला पाहायला मिळाला. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प सार्वजनिक ठिकाणांसह प्रचार सभांनाही मास्क न लावताच जात असल्याचं आतापर्यंत दिसून येत होतं.
अमेरिकी राष्ट्रपति ट्रंप पहली बार सार्वजनिक तौर पर मास्क पहने नज़र आए। अब तक वे मास्क पहने से इंकार करते रहे हैं। pic.twitter.com/22LHFQEzNo
— Umashankar Singh उमाशंकर सिंह (@umashankarsingh) July 12, 2020
मास्क न लावण्यासंदर्भात याआधी अनेकदा पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला होता. ट्रम्प यांनी वॉल्टर रीड राष्ट्रीय लष्करी वैद्यकीय केंद्राला भेट दिली. जखमी जवानांची व आरोग्य कर्मचाऱ्यांची त्यांनी भेट घेतली. ट्रम्प यांनी या भेटीवेळी तोंडावर मास्क लावलेला पाहायला मिळाला. "मला असं वाटतं की ज्यावेळी आपण रुग्णालयात असता विशेषतः एका विशिष्ट परिस्थितीत जेव्हा तुम्ही अनेक सैनिकांशी बोलता. काही लोक बरे झालेले आहेत अशा वेळी मला वाटतं मास्क घालणं ही चांगली गोष्ट आहे" असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
CoronaVirus News : कोरोनाचा विळखा! शास्त्रज्ञांनी दिला गंभीर इशाराhttps://t.co/s3yrkbm3L8#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia
— Lokmat (@MiLOKMAT) July 12, 2020
जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 567,744 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर तब्बल 12,847,955 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अमेरिका, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. तर दुसरीकडे देशात देखील कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात पानवाल्याने लढवली अनोखी शक्कल, सोशल मीडियावर जोरदार व्हायरलhttps://t.co/9QxMoQ3Wpl#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia
— Lokmat (@MiLOKMAT) July 11, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : "फक्त फुफ्फुसांवर नाही तर शरीरातील 'या' अवयवांवर हल्ला करतो कोरोना"
या देशाला आज मनमोहन सिंगांची गरज आहे, कारण...; शरद पवारांचं स्पष्ट मत
Bachchan Family Corona : जया बच्चन, ऐश्वर्या राय आणि आराध्याचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह
CoronaVirus News : कोरोनाचा धसका! पीपीई किट परिधान करून पानवाला चालवतोय टपरी
सोशल मीडियावर व्हायरल होणारा 140 नंबरबाबतचा 'तो' मेसेज म्हणजे अफवा
CoronaVirus News : कौतुकास्पद! ...अन् तिच्यासाठी डॉक्टर झाला गायक, Video पाहून तुम्हीही कराल सलाम