Good news: लवकरच संपणार कोरोनाचा कहर?; "वर्षभरात येऊ शकते कोरोना व्हॅक्सीन"
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 06:44 PM2020-06-26T18:44:31+5:302020-06-26T18:57:46+5:30
सध्या जगभरात जवळपास 100 कोरोना व्हॅक्सीन डेव्हलपमेन्ट वेगवेगळ्या पातळीवर आहेत.
वॉशिंग्टन : वैज्ञानिकांचा अंदाज आहे, की जगाला एका वर्षात अथवा त्याहूनही कमी काळात कोरोनावरील व्हॅक्सीन मिळू शकते, असे जागतीक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉक्टर टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर व्हॅक्सीन विकसित करणे, तिची निर्मिती करणे आणि नंतर वितरण करणे, यासाठी वैश्विक सहकार्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.
युरोपीयन संसदेच्या पर्यावरण, सार्वजनिक आरोग्य आणि अन्न सुरक्षा संदर्भातील बैठकीत टेड्रोस घेब्रेयेसस म्हणाले, व्हॅक्सीनन उपलब्ध करणे आणि नंतर ती सर्वांना वितरित करणे एक आव्हान असेल. यासाठी राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता असते.
सध्या जगभरात जवळपास 100 कोरोना व्हॅक्सीन डेव्हलपमेन्ट वेगवेगळ्या पातळीवर आहेत. ट्रेडोस म्हणाले, या महामारीने जागतीक एकी किती महत्वाची आहे, यावर प्रकाश टाकला आहे. तसेच, आरोग्याकडे एक किंमत म्हणून न पाहता, गुंतवणूक म्हणून बघायला हवे, असेही ते म्हणाले.
जगातील सर्वच देशांना, प्राथमिक आरोग्य सेवा आणि संकटाच्या स्थितीसाठी पूर्णपणे तयार असायला हवे. त्यासाठी त्यांनी काम करायला हवे, असेही टेड्रोस म्हणाले. याच वेळी त्यांनी जागतीक स्थरावर, युरोपीयन संघाच्या आवश्यकतेवरही भर दिला.
जागतीक महामारीच्या काळात सर्वांकडूनच चुका झाल्याचे टेड्रोस यांनी मान्य केले आहे. तसेच, डब्ल्यूएचओच्या वतीने एक स्वतंत्र पॅनलच्या माध्यमाने महामारीसंदर्भात देण्यात आलेल्या प्रतिक्रियांचे मूल्यांकन केले जाईल. जेणे करून झालेल्या चुका सुधारता येतील. हे पॅनल लवकरच आपले काम सुरू करेल.
7 दिवसांत कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 कोटींवर पोहोचणार -
भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यत 485,122 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर तब्बल 95 लाख लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, येत्या 7 दिवसांत म्हणजेच पुढच्या आठवड्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा हा तब्बल 1 कोटींवर पोहोचणार असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली आहे.
अमेरिकेमध्ये कोरोना विषाणूच्या साथीने पुन्हा डोके वर काढले असून, आता या आजाराने दक्षिण व पश्चिमेकडील राज्यांना ग्रासले आहे. राजकारणी तसेच निर्बंध पाळण्यात कुचराई करणारे नागरिक यांच्यामुळे ही साथ अधिकाधिक भागांत पसरत आहे, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या -
CoronaVirus : खूशखबर!; भारतात कोरोनाच्या आणखी एका औषधाला मिळाली मंजुरी, 'गेम चेंजर' ठरण्याचा दावा
CoronaVirus : खूशखबर!; भारतात कोरोनाच्या आणखी एका औषधाला मिळाली मंजुरी, 'गेम चेंजर' ठरण्याचा दावा
CoronaVirus News: "जगातील 'या' 170 कोटी लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका", 'हे' आहे कार