CoronaVirus News: अखेर WHOने मान्य केले! कोरोनाच्या प्रसारात वुहानची होती भूमिका, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 11:31 PM2020-05-08T23:31:44+5:302020-05-08T23:38:32+5:30
पीटर म्हणाले, प्राणी, इन्फेक्टेड दुकानदार, की ग्राहकांमधून हा व्हायरस मार्केटमध्ये आला, हे अद्याप स्पष्ट झालेली नाही. यावेळी त्यांनी अमेरिकेकडून चीनवर लावण्यात येणाऱ्या आरोपांवर कसल्याही प्रकारचे भाष्य केले नाही. अमेरिकेचे म्हणणे आहे, की हा व्हायरस चीनमध्येच जन्माला आल्याचे त्यांच्याकडे ठोस पुरावे आहेत.
पेइचिंग : कोरोना व्हायरसच्या मुद्द्यावरून संपूर्ण जग चीनवर आरोप करत आहे, की चीनने या व्हायरसचा फैलाव वेळेत रोखण्याचा प्रयत्न केला नाही आणि जगालाही या व्हायरसच्या धोक्यापासून अंधारात ठेवले. जागतीक आरोग्य संघटनेवरही (WHO) चीनची बाजू घेत असल्याचे अनेक आरोप झाले. मात्र, आता डब्ल्यूएचओने म्हटले आहे, की चीनमधील वुहान मार्केटच कोरोना व्हायरसच्या प्रसारासाठी जबाबदार आहे. त्यांनी या दिशेने अधिक संशोधन होण्याची आवश्यकता असल्याचेही म्हटले आहे.
वुहान मार्केटची भूमिका -
डब्ल्यूएचओचे फूड सेफ्टी झुनॉटिक व्हायरस एक्सपर्ट डॉ. पीटर बेन ऐंबरेक यांनी म्हटले आहे, की 'कोरोना व्हायरसच्या प्रसारात वुहान मार्केटची भूमिका असल्याचे स्पष्ट आहे, नेमकी भूमिका काय हे अम्हाला माहित नाही. हाच व्हायरसचा स्रोत आहे, की येथून तो परसला, की योगायोगाने काही रुग्ण मार्केटमध्ये आणि जवळपास सापडले.' या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी चीनने जानेवारी महिन्यात वुहान मार्केट बंद केले होते.
आणखी वाचा - CoronaVirus News : दीड महिन्यानंतर येऊ शकतं कोरोनावरील स्वस्त औषध, DGCIनं दिली 'क्लिनिकल ट्रायल'ची परवानगी
'अद्यापही उशीर झालेला नाही' -
पीटर म्हणाले, प्राणी, इन्फेक्टेड दुकानदार, की ग्राहकांमधून हा व्हायरस मार्केटमध्ये आला, हे अद्याप स्पष्ट झालेली नाही. यावेळी त्यांनी अमेरिकेकडून चीनवर लावण्यात येणाऱ्या आरोपांवर कसल्याही प्रकारचे भाष्य केले नाही. अमेरिकेचे म्हणणे आहे, की हा व्हायरस चीनमध्येच जन्माला आल्याचे त्यांच्याकडे ठोस पुरावे आहेत.
वेट मार्केट्सना नियमांची आवश्यकता -
पीटर म्हणाले, तपासासंदर्भात बोलयचेच तर, चीनकडे तपासाची सर्व साधणे आणि योग्य प्रकारचे संशोधकही आहेत. जगातील वेट मार्केट्समध्ये नियमांचे पालन करणे, तेथे स्वच्छता ठेवणे आणि काही मार्केट बंद करण्याचीही आवश्यकता आहे.
आणखी वाचा -
CoronaVirus News: जूनमध्ये कोरोना हाहाकार माजवणार? आरोग्य मंत्रालयाने दिले 'असे' उत्तर