CoronaVirus News : ...म्हणून ब्रिटनच्या पंतप्रधानांनी डॉक्टरांच्या नावावरून ठेवलं आपल्या मुलाचं नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 02:14 PM2020-05-04T14:14:14+5:302020-05-04T14:20:03+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनापासून बरे झाल्यानंतर बोरिस जॉन्सन यांना मुलगा झाल्याची देखील आनंदाची बातमी मिळाली. त्यांची जोडीदार कॅरी सायमंड्सने लंडनमधील रुग्णालयामध्ये एका गोंडस बाळाला जन्म दिला.

CoronaVirus Marathi News world doctors honoured by boris johnsons choice name baby SSS | CoronaVirus News : ...म्हणून ब्रिटनच्या पंतप्रधानांनी डॉक्टरांच्या नावावरून ठेवलं आपल्या मुलाचं नाव

CoronaVirus News : ...म्हणून ब्रिटनच्या पंतप्रधानांनी डॉक्टरांच्या नावावरून ठेवलं आपल्या मुलाचं नाव

googlenewsNext

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात दिली आहे. एक आठवड्यापूर्वी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर त्यांनी पुन्हा कामकाज सुरू केले आहे. गेल्या महिन्यात बोरिस जॉन्सन हे लंडनमधील सेंट थॉमस रुग्णालयामध्ये कोरोनाशी झुंज देत होते. त्यावेळी उपचारादरम्यान बोरिस जॉन्सन स्वत: लाच या परिस्थितीतून कसे बाहेर पडता येईल, याबद्दल सतत प्रश्न विचारत होते. दरम्यान, कोरोनापासून बरे झाल्यानंतर बोरिस जॉन्सन यांना मुलगा झाल्याची देखील आनंदाची बातमी मिळाली. त्यांची जोडीदार कॅरी सायमंड्सने लंडनमधील रुग्णालयामध्ये एका गोंडस बाळाला जन्म दिला.

बोरिस जॉन्सन यांनी आपल्या मुलाचे नाव त्यांना कोरोनापासून वाचवणाऱ्या डॉक्टरांच्या नावावरून ठेवले आहे. जॉन्सन आणि कॅरी यांनी आपले आजोबा आणि दोन डॉक्टरांच्या नावावरून मुलाचे नाव 'विल्फ्रेड लॉरी निकोलस' ठेवले आहे. कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या नावावरुन आपल्या बाळाचं नाव ठेवून त्यांनी अनोख्या पद्धतीने डॉक्टरांचे आभार मानले आहेत. निकोलस हे नाव जॉन्सन यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या नावावरुन ठेवण्यात आलं आहे. सायमंड्स यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली.

'विल्फ्रेड हे जॉन्सन यांच्या आजोबांचे नाव आहे. लॉरी हे माझ्या आजोबांचे नाव आहे. निकोलस हे डॉक्टर निक प्रिन्स आणि निक हार्ट यांच्या नावावरुन ठेवण्यात आलं आहे. याच दोन डॉक्टरांनी मागील महिन्यामध्ये जॉन्सनचे प्राण वाचवले' अशी माहिती सायमंड्स यांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. डॉक्टरांनी माझ्या मृत्यूची बातमी देण्याची तयारी केली होती, असे बोरिस जॉन्सन यांनी म्हटले आहे. 'द सन'ला दिलेल्या मुलाखतीत बोरिस जॉन्सन यांनी सांगितले की, त्यांना कोरोनाच्या उपचारादरम्यान अनेक लीटर ऑक्सिजन देण्यात आला.

55 वर्षीय जॉन्सन म्हणाले, "तो कठिण काळ होता. मी नाकारू शकत नाही. माझ्या तब्येतीत फार सुधारणा होत नव्हती. मला माहीत होती की, आकस्मित घटनेसंबधी प्लॅन तयार करण्यात येत आहे." कोरोनामुक्त ब्रिटन पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणाले की, काहीतरी चुकल्यास काय केले जाईल, याविषयी डॉक्टरांनी पूर्ण योजना आखली होती जॉन्सन यांना सुद्धा आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. हॉस्पिटलमधील उपचारासंदर्भात माहिती देताना बोरिस म्हणाले, मॉनिटरवर दिसणारा इंडिकेटर सतत चुकीच्या दिशेने जात होता. यावेळी समजले की कोरोनावर कोणताही उपचार नाही. तसेच काही दिवसांत माझी तब्येत कशी खराब झाली, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. मला आठवते की मी निराश झालो होतो. मी या आजारापासून का बरे होत नाही, हे मला समजू शकले नाही, असे  त्यांनी सांगितले. मात्र त्यानंतर काही दिवसांत ब्रिटनच्या पंतप्रधानांनी कोरोनावर मात केली. 


 

Web Title: CoronaVirus Marathi News world doctors honoured by boris johnsons choice name baby SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.