Coronavirus: बापरे! ...तर कोरोनामुळे अमेरिका, ब्रिटनमध्ये 27 लाख लोकांचा मृत्यू होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 12:55 PM2020-03-18T12:55:03+5:302020-03-18T13:04:59+5:30
Coronavirus: कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वच देश प्रयत्न करत आहेत.
लंडन - जगभरात कोरोना वेगाने पसरत आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वच देश प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे 7500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र याच दरम्यान करण्यात आलेल्या एक संशोधनातून अमेरिका आणि ब्रिटनची चिंता वाढली आहे. कोरोनामुळे अमेरिकेत 22 लाख तर ब्रिटनमध्ये 5 लाख लोकांचा मृत्यू होणार असल्याची भीती ही संशोधन अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे.
ब्रिटनमध्ये या अहवालानंतर पंतप्रधान बोरिस जोहान्सन यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी आणखी कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. ब्रिटनची अर्थव्यवस्था ही जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. लोकांना घराबाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच विविध आजार असलेल्या नागरिकांना वेगळे ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लंडन येथील प्राध्यापक नील फर्ग्युसन यांनी इटलीतील परिस्थितीच्या आधारे हे संशोधन केले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
Coronavirus : ...म्हणून गायीच्या दुधापेक्षा गोमूत्र, शेणाला मिळतोय इतका भावhttps://t.co/8gEUVkgeln#coronavirusindia#coronavirus
— Lokmat (@MiLOKMAT) March 18, 2020
कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी गंभीरपणे प्रयत्न न केल्यास ब्रिटनमध्ये 5 लाख आणि अमेरिकेत 22 लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो अशी माहिती फर्ग्युसन यांच्या टीमने म्हटलं आहे. तसेच कोरोनामुळे आरोग्य सेवेवर मोठा भार पडणार असल्याचे ही या संशोधनात म्हटले आहे. कोरोनाचा प्रभाव कमी होईपर्यंत लोकांनी पब, क्लब आणि थिएटरमध्ये न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या संशोधनात सहभागी झालेल्या प्रा. अझरा घनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे समाज आणि अर्थव्यवस्थेवर खूप मोठा ताण येणार आहे. तर आणखी एक सदस्य असलेल्या कोलबर्न यांनी येणारा काळ फार कठीण व आव्हानात्मक असणार असल्याचं म्हटलं आहे.
Coronavirus: एकूण 4 टप्पे! भारतात कोणत्या टप्प्यात आहे 'कोरोना'?, जाणून घ्या https://t.co/ztTqCrZuuv#coronavirusindia#Coronaindia
— Lokmat (@MiLOKMAT) March 18, 2020
संशोधनानंतर ब्रिटनमध्ये सरकारने कठोर पावले उचलली आहेत. अमेरिकेत कोरोनाचा 6,319 जणांना संसर्ग झाला असून 107 जणांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनमध्ये 1,950 जणांना करोनाचा संसर्ग झाला असून 71 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसचा फटका हा जगभरातील अनेक कंपन्यांना बसला आहे. कोरोनामुळे भारतात तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातील रुग्णांची संख्या 147 पर्यंत पोहोचली आहे. भारतात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. 122 भारतीयांना आणि 25 परदेशी व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आतापर्यंत दिल्लीमध्ये एक, कर्नाटकात एक आणि महाराष्ट्रात एक अशा एकूण 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आंध्र प्रदेशनमध्ये 1, दिल्लीमध्ये 10, हरियाणामध्ये 16, कर्नाटकात 11, केरळमध्ये 27, महाराष्ट्रात 42, ओडिशामध्ये 1, पंजाबमध्ये एका व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
Coronavirus: ...अन् पंतप्रधान मोदींनी भाजपा खासदारांची घेतली 'शाळा', शिकवला चांगलाच 'धडा'! https://t.co/XmbYPAccpO
— Lokmat (@MiLOKMAT) March 18, 2020
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : ...म्हणून गायीच्या दुधापेक्षा गोमूत्र, शेणाला मिळतोय इतका भाव
Coronavirus: कोरोनाचा संसर्ग वाढला! देशातील रुग्णांची संख्या 147
Coronavirus: एकूण 4 टप्पे! भारतात कोणत्या टप्प्यात आहे 'कोरोना'?, जाणून घ्या
Coronavirus: राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 42वर, पुण्यात आढळला आणखी एक रुग्ण
Coronavirus: सामान्यांचं सोडा; संसदेलाच मिळेनात सॅनिटायझर आणि मास्क