China Coronavirus : जगाला 'कोरोना'चा विळखा! आरोग्यमंत्र्यांनाच झाली लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 03:42 PM2020-02-27T15:42:31+5:302020-02-27T15:48:44+5:30
China Coronavirus : चीनपुरता हा व्हायरस मर्यादित नसून जगातील सुमारे 48 देशांतील लोकांना त्याची लागण झाली आहे.
बीजिंग - चीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने जगाला विळखा घातला आहे. चीनपुरता हा व्हायरस मर्यादित नसून जगातील सुमारे 48 देशांतील लोकांना त्याची लागण झाली आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे जगभरात चिंतेचे वातावरण असून, 40 हून अधिक देशांनी हाय अलर्ट घोषित केला आहे. कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. आतापर्यंत कोरोनामुळे तब्बल 2,802 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल 82,059 लोकांना त्याचा संसर्ग झाला आहे. तसेच चीननंतर दक्षिण कोरिया आणि इराणमध्ये कोरोनाच्या संसर्ग झाला आहे.
इराणमध्ये 15 जणांचा मृत्यू झाला असून 95 हून अधिक जणांना लागण झाली आहे. इराणचे उप आरोग्यमंत्री इराज हरीची यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. हरीची यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची अधिकृत माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. रविवारी (24 फेब्रुवारी) कोरोनामुळे 150 जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या 150 पैकी 149 नागरिक हे हुबेई प्रांतातील असल्याची माहिती चीनच्या राष्ट्रीय आरोग्य विभागाने दिली आहे. तसेच 409 नवीन रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत.
The 112 evacuees who were brought to Delhi today from Wuhan, China by C-17 Globemaster aircraft of Indian Air Force, at the Indo-Tibetan Border Police's quarantine facility in Chhawla. pic.twitter.com/3o4ofWgMUz
— ANI (@ANI) February 27, 2020
अवघ्या 17 दिवसांच्या बाळाने कोरोनावर मात केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे कोणतेही उपचार न घेता या बाळाने कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. या 17 दिवसांच्या बाळाच्या शरीरात कोरोना व्हायरस नसून त्याचं आरोग्य उत्तम असल्याची माहिती मिळत आहे. सीओ सीओ (Xiao Xiao) असं या बाळाचं नाव आहे. चीनमध्ये एका गर्भवती महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे गर्भातच बाळाला कोरोनाचा संसर्ग झाला.
China Coronavirus : चमत्कार! अवघ्या 17 दिवसांच्या बाळाने केली कोरोनावर मात https://t.co/oFmP0DosrQ#coronavirus
— Lokmat (@MiLOKMAT) February 26, 2020
गेल्या महिन्यापासून चीनमध्ये अडकून पडलेल्या 90 भारतीयांची आरोग्य तपासणी बुधवारी झाली. त्यानंतर आज शुक्रवारी पहाटे राजधानी दिल्ली येथे त्यांचे आगमन झाले. रोगाच्या विळख्यात अडकलेल्या भारतीयांनी मायभूमीवर पाऊल ठेवताच सुटकेचा निश्वास टाकला. साताऱ्याच्या कन्या अश्विनी पाटील यांनीही मायभूमीत येताच आनंद व्यक्त करत, लोकमतने दाखवलेल्या तत्परतेचे आभार मानले.
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी साताऱ्याची कन्या असलेल्या अश्विनी पाटील यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर, सातत्याने गेल्या अनेक दिवसांपासून ते भारतीय दूतावासाशी संपर्कात होते. तर, भारतीय दुतावास चीन सरकारशी समन्वय साधत होता. अखेर बुधवारी चीनमध्ये अडकलेल्या 90 भारतीयांची तपासणी झाली. त्यांना भारतात आणण्यासाठी वुहान येथे विमान पाठविण्यात आले. आज पहाटेच्या सुमारास या सर्वच भारतीयांची घरवापसी झाली. आपल्या भारत भेटीनंतर सर्वांनीच अत्यानंद व्यक्त केला.
Coronavirus : चीनमध्ये अडकलेल्या 90 भारतीयांचे मायभूमीत आगमन, कुटुंबीयांना अत्यानंद @prithvrjhttps://t.co/0ab7hRSwI2
— Lokmat (@MiLOKMAT) February 27, 2020
महत्त्वाच्या बातम्या
Delhi Violence : 'दिल्ली हिंसाचारावर राजकीय पक्षांकडून घाणेरडं राजकारण'
Delhi Violence : गृहमंत्री अमित शाह यांना हटवा, सोनिया गांधींची राष्ट्रपतींकडे मागणी
Delhi Violence: आप नगरसेवक ताहीर हुसैन यांच्या घरात सापडला दगड-विटा, पेट्रोल बॉम्बचा साठा
Delhi Violence: दिल्ली हिंसाचारातील पीडित बेघर मुस्लीम कुटुंबीयांना दिला हिंदू परिवाराने आसरा