कोरोनाचा सगळ्यात मोठा फटका मिलेनिअल्सना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 04:21 PM2020-04-13T16:21:29+5:302020-04-13T16:25:46+5:30

मिलेनिअल जनरेशन बेफिकीर, पैसा सांभाळून पण जीव धोक्यात!

coronavirus : millennials not taking coronavirus seriously. | कोरोनाचा सगळ्यात मोठा फटका मिलेनिअल्सना!

कोरोनाचा सगळ्यात मोठा फटका मिलेनिअल्सना!

Next
ठळक मुद्देजनरेशन कोरोना

कोरोनाच्या निमित्तानं एक नवीन शब्द सध्या चर्चेत येतो आहे. त्याचं नाव जनरेशन कोरोना. म्हणजे काय तर मिलेनिअल्सची अर्थात 1981 ते 1996 या दरम्यान जन्माला आलेल्या तरुण वर्गाची ही अशी पिढी, जी जगून घ्या हेच तत्वज्ञान जगभर जगते.
त्यांच्या खर्च करण्याच्या सवयी, खाण्यापिण्याच्या, चटचट नोक:या बदलून, पटपट नवीन सारं शिकण्याच्या, इमोशनल घोळ न घालण्याच्या सवयी हे सारं या मिलेनिअल्स पिढीचं वैशिटय़ मानलं जातं. मात्र वित्तविषयक वार्ताकन करणा:या एक  वृत्तवाहिनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार कोरोनाचा सगळ्यात मोठा फटका या मिलेनिअल्सना बसला आहे.
सगळ्यात जास्त त्यांच्या सवयी बदलल्या आहे. सगळ्यात जास्त कुणाचं आयुष्य बदललं असेल तर ते त्यांचं बदललं आहे. आणि ते ही जगभर.
सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या मुलांची जीवनशैली अत्यंत खर्चिक मानली जाते. जे हवं ते लगेच खरेदी करण्याकडे त्यांचा कल असतो. मात्र सगळ्यात मोठा बदल हा होताना दिसतो आहे की, ही मिलेनिअल्स पिढी विचार करुन खरेदी करते आहे. त्यांच्या विकत घेण्याच्या सवयीनाच या कोरोनाने मोठा तडाखा दिला आहे.

 


एकीकडे व्यक्तिगत आयुष्यात हे चांगलं असलं तरी या मिलेनिअल्सना डोळ्यासमोर ठेवून जी बाजारपेठ फिरत होती, तेजीत होती तिच्यावर थेट परिणाम या खरेदी करण्याच्या बदलत्या सवयींचा होणार आहे.
ज्याला पर्चेस डिसिजन म्हणतात अर्थात खरेदीनिर्णयक्षमता तिचे सारे ठोकताळेच या कोरोनाच्या संकटाने बदलून टाकले आहेत. मुख्य म्हणजे या पिढीने इतकी आर्थिक असुरक्षितता जगभरात पहिल्यांदाच अनुभवली आहे.
ंमात्र पैशांचा असा नेमका विचार ब:यौपकी सुरु झालेला असला तरी ही जगभरातच ही मिलेनिअल्सची पिढी अतीआत्मविश्वासात आहे , आणि आपल्याला कोरोना होवूच शकत नाही असं बहुतांश तरुण मुलांना वाटतं.
यासंदर्भात तरुण मुलांचे कान धरत, जागतिक आरोग्य संघटनेनं अलिकडेच चिंताही व्यक्त केली आहे.
संघटनेचे अधिकारी डॉ. ब्रुस अॅलवर्ड यांनी अलिकडेच सांगितलं की, ‘ आजवरच्या तुमच्या किंवा तुमच्या पालकांच्याही आयुष्यात असा जगभर पसरलेला, महामारी ठरलेला आजार कुणाच्याही पाहण्यात नव्हता. त्यामुळे जे र्निदेश सरकार देतं आहे ते ऐका, त्याचं पालन करा! हा आजारच आपल्याला अनोळखी आहे. त्यामुळे आपण तरुण आहोत, आपल्याला काय होतंय, आपण काही मरणार नाही अशा भ्रमात राहू नका. या आजाराचे वाहकही बनू नका.
इटली, चिन आणि दुबईचा अभ्यासही हे सांगतो की, कोरोनाची लागण तरुणांना अर्थात जे वयाच्या विशीत, तिशीत, चाळीशीत आहे, त्यांना अधिक होतो. जे अत्यवस्थ होऊन दवाखान्यात दाखल होतात, ते बुजुर्ग असले तरी लागण झालेल्यांत तरुणांचाच समावेश अधिक आहे.त्यामुळे तरुणांना गाफिल राहू नये!’
मात्र तरीही जगभरातच ही जनरेशन मिलेनिअल्स घरात बसायला तयार नाही, आपल्याला काही होणार नाही असा त्यांचा अनाठायी समज आहे. आता जागतिक आरोग्य संघटनेने तरुणांमध्येच जनजागृती करा असं शासनांना सांगायला सुरुवात केली आहे.
 

Web Title: coronavirus : millennials not taking coronavirus seriously.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.