नवनव्या कोरोना व्हेरिएंटशी लढण्यासाठी मिक्स व्हॅक्सीनचा फॉर्म्युला; 'हे' मोठे देश वापरतायत 'ही' खास पद्धत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 16:40 IST2021-08-10T16:38:24+5:302021-08-10T16:40:43+5:30
या विषयावर भारतातही बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. भारतात नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता की, कोविशील्ड आणि कोव्हॅसीन लसी एकत्रित केल्यास अधिक चांगले प्रोटेक्शन मिळू शकते. (mixed vaccine formula)

नवनव्या कोरोना व्हेरिएंटशी लढण्यासाठी मिक्स व्हॅक्सीनचा फॉर्म्युला; 'हे' मोठे देश वापरतायत 'ही' खास पद्धत
कोरोनावर मात करण्यासाठी भारतासह जगातील विविध देशांत लसीकरण मोहीम सुरू आहे. कोरोनाच्या विविध व्हेरिएंटचा सामना करण्यासाठी, आता जगातील अनेक देशांमध्ये लसी मिक्स करण्याचे काम सुरू आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) याला विरोध केला असला तरी, अनेक देशांनी या दिशेने पावले टाकायलाही सुरुवात केली आहे. (CoronaVirus mixed vaccine formula to fight the new corona variants countries report)
या विषयावर भारतातही बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. भारतात नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता की, कोविशील्ड आणि कोव्हॅसीन लसी एकत्रित केल्यास अधिक चांगले प्रोटेक्शन मिळू शकते. भारतात याचा अभ्यास ICMR ने केला होता.
जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे, की लस एकत्र करणे सध्या घातक ठरू शकते. लसीचा पहिला आणि दुसरा डोस वेगवेगळा घेणे फायदेशीर आहे, हे सिद्ध करण्यासाठी अद्याप कुठलाही डेटा नाही. याशिवाय, आपण अंतिम निर्मय पब्लिक हेल्थ अथॉरिटीवर सोडत आहोत, असेही डब्ल्यूएचओने म्हटले आहे.
CoronaVirus : कोव्हॅक्सीन घेतलेल्यांची विचित्र कोंडी, टेन्शन वाढलं...! ठोठावला न्यायालयाचा दरवाजा
'या' देशांमध्ये वापर सुरू -
रशिया- रशिया डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडने स्वतःला लस कॉकटेलमधील अव्वल म्हटले आहे. रशियाकडून Sputnik-V आणि AstraZenecaच्या डोसचे कॉकटेल तयार करण्यात आले. यात कुठलेही मोठे दुष्परिणाम दिसून आले नाहीत. या महिन्याच्या शेवटी यासंदर्भात अंतिम निकाल जाहीर होईल.
डेन्मार्क- येथे करण्यात आलेल्या चाचणीत, अॅस्ट्राझेनेकाचा पहिला डोस दिल्यानंतर, दुसरा डोस फायझर अथवा मॉडर्ना लसीचा देण्यात आल्यास कोरोनापासून चांगल्या प्रकारचे संरक्षण होते.
दक्षिण कोरिया - येथे करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, असे समोर आले आहे, की अॅस्ट्राझेनेका लसीचा पहिला डोस आणि फायझरचा दुसरा डोस घेतल्यास, अॅस्ट्राझेनेकाच्या दोन्ही डोसच्या तुलनेत 6 पट अधिक चांगले संरक्षण मिळते.
याशिवाय, जर्मनी, थायलंड, कॅनडा आणि स्पेन या देशांतही करोनाचा सामना करण्यासाठी वेगवेगळ्या लसींचे डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जगातील अनेक देशांत कोरोनाचा सामना करण्यासाठी वेगवेगळ्या रणनीतीवर काम सुरू आहे.