coronavirus : अमेरिका, युरोपमध्ये कोरोनाचे थैमान थांबता थांबेना, जगभरात 90 हजारांहून अधिक मृत्युमुखी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 08:53 AM2020-04-10T08:53:32+5:302020-04-10T09:11:11+5:30
जगभरात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 90 हजारांच्या वर पोहोचला आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही इटली, स्पेन आणि अमेरिकेतील रुग्णांची आहे.
न्यूयॉर्क - संपूर्ण जगाला विळखा घालणाऱ्या कोरोना विषाणूमुळे अमेरिका आणि युरोपमध्ये गंभीर परिस्थिती ओढवली आहे. जगभरात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 90 हजारांच्या वर पोहोचला आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही इटली, स्पेन आणि अमेरिकेतील रुग्णांची आहे. भारतातही कोरोनाबाधितांचा आकडा साडेपाच हजारांच्या वर पोहोचला आहे.
कोरोना विषाणूमुळे जगभरात आतापर्यंत 90 हजार 938 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू हे इटलीमध्ये झाले आहे. इटलीमध्ये आतापर्यंत 18 हजार 279 जणांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमध्येही कोरोनामुळे मृत्यूचे थैमान सुरू आहे. स्पेनमध्ये आतापर्यंत 15 हजार 238 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या अमेरिकेत कोरोनामुळे 14 हजार 830 जणांचा मुत्यू झाला आहे.
अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित झाले आहे. न्यूयॉर्कमध्ये सलग तिसऱ्या दिवशी कोरोनामुळे 799 जणांचा मृत्यू झाला आहे. तर फ्रान्समध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 10 हजार 869 जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, जगभरात आतापर्यंत 15 लाख 34 हजार 426 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. जगातील सुमारे 200 हुन अधिक देशात कोरोनाचा फैलाव झाला असून, जगातील अनेक देशात उद्योग व्यवसाय ठप्प झाले आहे.