Coronavirus : 100 गाड्यांचा ताफा अन् बरंच काही... अमेरिकेत भारतीय डॉक्टरचा अनोखा सन्मान, Video पाहून वाटेल अभिमान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 10:17 AM2020-04-23T10:17:48+5:302020-04-23T10:27:12+5:30
Coronavirus : कोरोनाग्रस्तांसाठी वैद्यकिय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहेत. अशीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे.
वॉशिंग्टन - जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 1,80,000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर कोरोनाग्रस्तांची संख्या 26 लाखांवर पोहोचली आहे. कोरोनाग्रस्तांसाठी वैद्यकिय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहेत. अशीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. अमेरिकेत कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या भारतीयडॉक्टरचा अनोख्या पद्धतीने सन्मान करण्यात आला आहे.
उमा मधूसूदन असं या भारतीय वंशाच्या डॉक्टरचं नाव असून त्या सध्या साऊथ विंडसरमध्ये राहतात. उमा मधूसूदन यांनी अमेरिकेत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार केले असून त्यातील अनेक जण बरे झाले आहेत. उमा यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाचा अमेरिकेतील लोकांनी अनोख्यारितीने सन्मान केला आहे. तब्बल 100 गाड्यांच्या ताफ्यासह त्यांचे आभार मानले आहेत. अमेरिकेतील लोकांनी गाड्यांचे हॉर्न वाजवत त्यांचा सन्मान केला. या कौतुकास्पद घटनेचा एक व्हिडिओ अनेकांनी शेअर केला असून सोशल मीडियावरही जोरदार व्हायरल झाला आहे.
Dr Uma Madhusudan, an Indian doctor, was saluted in a unique way in front of her house in USA in recognition of her selfless service treating Covid patients pic.twitter.com/Hg62FSwzsP
— Harsh Goenka (@hvgoenka) April 20, 2020
पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिकेच्या गाड्यांनीही सायरन वाजवून त्यांचा सन्मान केला. तसेच उमा यांनी उपचार केलेल्या लोकांनी हातात पोस्टर्स धरले आहेत ज्यामध्ये त्यांनी डॉक्टरचे आभार मानले आहेत. व्हिडिओमध्ये उमा यांच्या घरासमोरून जाताना प्रत्येक गाडी हॉर्न वाजवून उमा यांचा सन्मान करत असल्याचं पाहायला मिळत आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची आणि मृतांची संख्या ही सर्वाधिक आहे. अमेरिकेतील कोरोनाबधितांचा आकडा आठ लाखांहून अधिक झाला आहे. अमेरिकेतील परिस्थिती दिवसेंदिवस कोरोनामुळे गंभीर होत चालली आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या 849,092 झाली असून आतापर्यंत 47,681 जणांचा मृत्यू झाला आहे.
Coronavirus : बापरे! 2 महिन्यांनंतरही शरीरात जिवंत आहे व्हायरस, ठीक झालेल्या रुग्णांना कोरोनाची लागणhttps://t.co/5fgPWRKsKM#CoronaVirusUpdates#CoronaLockdown
— Lokmat (@MiLOKMAT) April 23, 2020
जगात कोरोनाच्या आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या 26 लाख 37 हजारांवर गेली असून, मृतांचा एकूण आकडा 1 लाख 84 हजारांच्या घरात पोहोचला आहे. तर आतापर्यंत जगभरात 7 लाख 17 हजार 635 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. अमेरिकेत कोरोनामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अमेरिकेनंतर इटलीत सर्वाधिक मृत्यू झाले असून कोरोनाग्रस्तांची संख्या 187,327 वर गेली आहे. तर तब्बल 25,085 लोकांचा मृत्यू झाला आहे.
Coronavirus : कोरोनाचा विळखा! जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 26 लाखांवर, 184,217 जणांचा मृत्यूhttps://t.co/fhXiL8a5g3#CoronaLockdown#coronaupdatesindia
— Lokmat (@MiLOKMAT) April 23, 2020
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : बापरे! 2 महिन्यांनंतरही शरीरात जिवंत आहे व्हायरस, ठीक झालेल्या रुग्णांना कोरोनाची लागण
Coronavirus : कोरोनाचा विळखा! जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 26 लाखांवर, 184,217 जणांचा मृत्यू
CoronaVirus: कोरोना प्रसाराचा वेग देशात दुप्पट नाही; आरोग्य मंत्रालयाचा दावा
CorornaVirus: देशात १४८६ जणांची भर; कोरोना रुग्णांची संख्या २१,३७० वर