Coronavirus : कोरोनाचा कोट्यवधी लोकांना फटका बसणार, जगभरात बेरोजगारांची संख्या वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 03:17 PM2020-03-19T15:17:22+5:302020-03-19T15:25:00+5:30

Coronavirus : कोरोनामुळे 170 हून अधिक देश प्रभावित झाले असून मृत्यूची संख्या 8,983 वर पोहोचली आहे.

Coronavirus Nearly 2.5 crore jobs could be lost worldwide due to corona SSS | Coronavirus : कोरोनाचा कोट्यवधी लोकांना फटका बसणार, जगभरात बेरोजगारांची संख्या वाढणार

Coronavirus : कोरोनाचा कोट्यवधी लोकांना फटका बसणार, जगभरात बेरोजगारांची संख्या वाढणार

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनाचा कोट्यवधी लोकांना फटका बसणार असून जगभरात बेरोजगारांची संख्या वाढणार.जगभरातील बेरोजगारांची संख्या 2 कोटी 50 लाखांपर्यंत वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली. आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने याबाबत माहिती दिली आहे.

जिनिव्हा - चीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या गुरुवारी (19 मार्च) दुपारीपर्यंत 2,20, 327 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे 170 हून अधिक देश प्रभावित झाले असून मृत्यूची संख्या 8,983 वर पोहोचली आहे. दुसरीकडे 85,769 लोक बरेही झाले आहेत. कोरोनाचा फटका हा अनेक कंपन्यांना देखील मोठ्या प्रमाणात बसला आहे. कोरोनाचा कोट्यवधी लोकांना फटका बसणार असून जगभरात बेरोजगारांची संख्या वाढणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील बेरोजगारांची संख्या 2 कोटी 50 लाखांपर्यंत वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने याबाबत माहिती दिली आहे. संघटनेच्या रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, अनेक मोठ्या कंपन्यांनी उत्पादन प्रकल्प बंद ठेवले आहेत. आर्थिक संकटामुळे कंपन्यांकडून कामगार कपात केली जाऊ शकते. यामुळे जवळपास 2 कोटी 50 लाख कामगार बेरोजगार होऊ शकतात. मंदी आणि कामगार कपातीने यंदा कामगारांचे 3400 डॉलर्सचे नुकसान होईल असं संघटनेने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

मंदीने कंपन्यांकडून कामगार कपात केली जाईल तसेच कंपन्या वेतन कमी करून खर्च कमी करण्याला प्राधान्य देतील.  2020 च्या अखेरीस कर्मचाऱ्यांना 860 अब्ज डॉलर ते 3400 डॉलर्सचे नुकसान होऊ शकतं असं आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने म्हटलं आहे. भारतात देखील कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. कोरोनामुळे भारतात तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच रुग्णांची संख्या 171 पर्यंत पोहोचली आहे. 

भारतात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. 122 भारतीयांना आणि 25 परदेशी व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने बुधवारी दिली होती. त्यानंतर आता गुरुवारी (19 मार्च) 146 भारतीयांना आणि 25 परदेशी व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. देशातील 16 राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण आहेत. यातील काहींना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत दिल्लीमध्ये एक, कर्नाटकात एक आणि महाराष्ट्रात एक अशा एकूण 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेश, उत्तराखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये 1, दिल्लीमध्ये 11, हरियाणामध्ये 16, कर्नाटकात 13, केरळमध्ये 27, महाराष्ट्रात 49, पंजाबमध्ये 3, तेलंगणामध्ये 12, राजस्थान 7, उत्तर प्रदेशमध्ये 17, लडाख 8, तमिळनाडू 2, जम्मू-काश्मीर 4 व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या 

Coronavirus : संपूर्ण कुटुंबाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, 'या' सरकारने 1 किमीपर्यंत कर्फ्यू लावला!

Coronavirus: हे विषाणूशी युद्धच; आम्ही लढतोय, पण तुमचं आणखी सहकार्य हवंयः मुख्यमंत्र्यांची साद

Coronavirus : देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली; जाणून घ्या कोणत्या राज्यात किती रुग्ण?

Coronavirus : 'राहुल गांधींनी कार्टून चॅनलऐवजी न्यूज चॅनल पाहावं'

Coronavirus: हाहाकार! इटलीमध्ये 24 तासांत 475 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; विद्यार्थी बनले डॉक्टर

 

Web Title: Coronavirus Nearly 2.5 crore jobs could be lost worldwide due to corona SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.