लॉकडाउनमध्ये  घराबाहेर फिरायला गेलात? न्यूझीलंडच्या आरोग्यमंत्र्याला डच्चू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 04:45 PM2020-04-13T16:45:08+5:302020-04-13T16:48:59+5:30

न्यूझीलंडच्या  कणखर पंतप्रधानांनी सांगितलं, कायद्यापेक्षा कुणी मोठा नाही!

coronavirus : new-zealand-health-minister-demoted-after-beach-visit- in lockdown | लॉकडाउनमध्ये  घराबाहेर फिरायला गेलात? न्यूझीलंडच्या आरोग्यमंत्र्याला डच्चू!

लॉकडाउनमध्ये  घराबाहेर फिरायला गेलात? न्यूझीलंडच्या आरोग्यमंत्र्याला डच्चू!

Next
ठळक मुद्देकायद्यापेक्षा आणि जनतेच्या आरोग्यापेक्षा कुणीही मोठा नाही हे  न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी देशवासियांनाच नाही तर जगभरातल्या लोकांना सोदाहरण सांगितलं आहे

आरोग्य मंत्र्यानेच नियम मोडला, घरी राहण्याचा हुकूम मानला नाही म्हणून पंतप्रधानांनी त्यांना झापलं आणि त्यांना पदावनत केलं, यावर एरव्ही कुणी विश्वास ठेवला असता?
मात्र न्यूङिालण्डमध्ये हे घडलं आणि न्यूझीलंडच्या कणखर पंतप्रधान जेसिका अण्डरसन यांनी दाखवून दिलं की, कायद्यासमोर कुणीच मोठा नाही.
घडलं असं की, न्यूझीलंडचे आरोग्यमंत्री डेव्हीड क्लार्क, गेल्या सप्ताहांती त्यांच्याकडेही लॉकडाऊन जाहीर झालं. जीवनावश्यक गोष्टींसाठीही अगदीच गरजेचं असेल तर बाहेर पडा असे जनतेला आदेश होते.‘स्टे अॅट होम!’ हे तत्व सगळ्यांनी पाळावं अशी अपेक्षा होती.
मात्र स्वत: आरोग्यमंत्रीच माऊण्टन बाइक राइडला गेले. सा:या कुटुंबाला घेऊन घरापासून 20 किलोमीटर लांब समूद्रकिनारी फिरायला गेले. नियमांचे त्यांनी उल्लंघन तर केलेच, पण त्यांचे ते फोटो व्हायरल झाले. देशात प्रचंड असंतोष निर्माण झाला. लोक चिडले. आरोग्यमंत्रीच असे बेजबाबदार वागणार असतील तर व्यवस्थेवर लोकांनी कसा विश्वास ठेवायचा असे प्रश्न उभे राहिले.


त्यावर क्लार्क यांनी माफी मागितली. मी चुकलो, मी ‘इडियट’ आहे असं त्यांनी जाहीरपणो मान्य केलं. एवढंच नाही तर झाल्या चुकीबद्दल पंतप्रधानांकडे राजीनामाही सुपूर्द केला. त्यांनी तो स्वीकारला नाही.
मात्र त्यांनी क्लार्क यांनी समज तर दिलीच पण त्यांची पदावनती केली. त्यांच्याकडे असलेलं अर्थ मंत्रलयाची संयुक्त जबाबदारी काढून घेतली. कॅबिनेट मंत्र्यांसाठी असलेलं त्यांचं रॅकिंग एकदम कमी केलं.
आणि त्यावर पंतप्रधान म्हणाल्या की, एरव्ही मी त्यांचा राजीनामाच घेतला असता, जे घडलं ते अक्षम्य आहे. मात्र आता सा:या देशानं एकत्र येऊन लढण्याची गरज आहे. म्हणून आरोग्य मंत्रलय आणि व्यवस्था यात मी मोठे फेरबदल करत नाही. मात्र जे त्यांनी केलं, ते चूकच आहे. त्यासाठी त्यांना किंमत मोजावीच लागेल!’
थेट मंत्र्यालाच पदावनत करत त्यांनी एक पायंडाही घालून दिला.
कायद्यापेक्षा आणि जनतेच्या आरोग्यापेक्षा कुणीही मोठा नाही हे  न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी देशवासियांनाच नाही तर जगभरातल्या लोकांना सोदाहरण सांगितलं आहे

Web Title: coronavirus : new-zealand-health-minister-demoted-after-beach-visit- in lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.