CoronaVirus News: जगात कोरोनामुळे ५५ लाख मृत्यू; रुग्णसंख्या ३३ कोटींवर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 06:00 AM2022-01-21T06:00:11+5:302022-01-21T06:00:28+5:30
जगामध्ये कोरोनाच्या आजारातून २७ कोटी ३२ लाख जण बरे झाले. ६ कोटींहून अधिक लोकांवर उपचार सुरू असून त्यातील ९६ हजार जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
वॉशिंग्टन : जगभरात कोरोनाचे ३३ कोटी ९७ लाख रुग्ण असून आजवर त्यातील ५५ लाख ८४ हजार जणांचा मृत्यू झाला. अमेरिकेत ६ कोटी ९८ हजारांहून अधिक बाधित आहेत. त्यापैकी ४ कोटी ३८ लाख बरे झाले.
जगामध्ये कोरोनाच्या आजारातून २७ कोटी ३२ लाख जण बरे झाले. ६ कोटींहून अधिक लोकांवर उपचार सुरू असून त्यातील ९६ हजार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. गेल्या चोवीस तासांत जागतिक स्तरावर कोरोनाचे ३४.६१ लाख नवे रुग्ण आढळून आले. तसेच १८.५८ लाख लोक बरे झाले. अमेरिकेमध्ये सर्वाधिक कोरोेना रुग्ण असून त्यानंतर भारत, ब्राझिल, ब्रिटन, फ्रान्स, रशिया, तुर्कस्थान, इटली, स्पेन, जर्मनी यांचा क्रमांक लागतो. कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी अमेरिकेमध्ये अडीच कोटी लोक आहेत. कोरोनाची साथ सुरू झाली, त्यावेळी तीन आठवडे अजिबात घराबाहेर पडू नये, असा आदेश स्पेन सरकारने आपल्या नागरिकांना दिला होता. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवहार बंद असल्याने स्पेनच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले