CoronaVirus News : कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा धसका! 'या' देशातील एक कोटी नागरिकांवर लॉकडाऊनचे निर्बंध

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 08:37 PM2021-06-29T20:37:02+5:302021-06-29T20:50:21+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: रुग्णसंख्या तब्बल 182,304,517 वर पोहोचली आहे. तर 3,948,005 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

CoronaVirus News australians go under lockdown in fight against covid 19 delta variant | CoronaVirus News : कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा धसका! 'या' देशातील एक कोटी नागरिकांवर लॉकडाऊनचे निर्बंध

CoronaVirus News : कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा धसका! 'या' देशातील एक कोटी नागरिकांवर लॉकडाऊनचे निर्बंध

Next

कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगभरातील रुग्णांच्या संख्येने 18 कोटींचा टप्पा पार केला आहे. एकूण रुग्णसंख्या तब्बल 182,304,517 वर पोहोचली आहे. तर 3,948,005 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच अनेक देशात पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. याच दरम्यान कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने थैमान घातले आहे. डेल्टा व्हेरिएंटच्या धास्तीने ऑस्ट्रेलियातील चार शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियातील पर्थ, ब्रिस्बेन, सिडनी आणि डार्विनमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. 

सरकारी आकडेवारीनुसार, या चार शहरांची लोकसंख्या ही जवळपास एक कोटी आहे. सोमवारपर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये कोरोनाची २७१ सक्रिय प्रकरणे आहेत. यामधील बहुतांशी बाधित न्यू साउथ वेल्समधील आहेत. ऑस्ट्रेलियाने याआधी कोरोनावर नियंत्रण मिळवल्याचा दावा करत जल्लोष साजरा केला होता. त्यानंतर त्यांची अर्थव्यवस्थाही रुळावर येत होती. मात्र आता कोरोना विषाणूच्य़ा डेल्टा व्हेरिएंटचा ऑस्ट्रेलियात प्रसार होत आहे. तर, दुसरीकडे ऑस्ट्रेलियन सरकारला मोठ्या प्रमाणावर कोरोना लसीकरण करणे शक्य झाले नाही. पर्थमध्ये नागरिकांना घरातच राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

कोरोनाबाधितांची संख्या वाढू नये यासाठी सरकारी पातळीवरून विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. बाधितांची संख्या कमी असतानाच संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. जगात करोनाबाधितांची संख्या 18.13 कोटी झाली आहे. तर, मृतांची संख्या 39.3 लाख झाली आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने ही माहिती दिली. अमेरिकेत सर्वाधिक करोनाबाधित आणि मृतांची नोंद करण्यात आली. अमेरिकेत तीन कोटी 36 लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली. तर, सहा लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

चिंताजनक! कोरोनाचा Delta Variant अधिक खतरनाक; निष्काळजीपणा ठरू शकतो जीवघेणा; WHO चा गंभीर इशारा

कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहेत. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. याच दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने गंभीर इशारा दिला आहे. WHO चे प्रमुख डॉ. टेड्रॉस यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यामध्ये त्यांनी Delta Variant हा कोरोनाचा सर्वाधिक संक्रमण होणारा प्रकार असल्याचं म्हटलं आहे. तसेच हा प्रकार घातक असून निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो असं देखील म्हटलं आहे. "पहिल्यांदा भारतात आढळून आलेल्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचे जगातील जवळपास 85 देशांमध्ये रुग्ण आढळले आहेत. आजपर्यंत सापडलेल्या कोरोना व्हेरिएंटमध्ये हा प्रकार सर्वाधिक वेगाने संक्रमण होणारा प्रकार आहे. आपण सर्वांनी सार्वजनिक आरोग्य आणि कोरोनासंदर्भातल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करणं आवश्यक आहे. त्यासोबतच या व्हायरला रोखायचं असल्यास जगातील सर्वच देशांमध्ये समान पद्धतीने लसींचा पुरवठा व्हायला हवा" असं देखील टेड्रॉस यांनी म्हटलं आहे.

 

Web Title: CoronaVirus News australians go under lockdown in fight against covid 19 delta variant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.