CoronaVirus News : तब्बल 505 दिवस 'तो' कोरोनाशी लढला पण...; संशोधक झाले हैराण, केला धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 05:02 PM2022-04-23T17:02:10+5:302022-04-23T17:16:48+5:30

CoronaVirus News : एका व्यक्तीने तब्बल 505 दिवस म्हणजे दीड वर्षे कोरोनाशी झुंज दिली. पण अखेर कोरोनाविरोधातील लढा तो हरला. त्या रुग्णाबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

CoronaVirus News britain patient was infected with covid 19 for 505 days straight | CoronaVirus News : तब्बल 505 दिवस 'तो' कोरोनाशी लढला पण...; संशोधक झाले हैराण, केला धक्कादायक खुलासा

CoronaVirus News : तब्बल 505 दिवस 'तो' कोरोनाशी लढला पण...; संशोधक झाले हैराण, केला धक्कादायक खुलासा

Next

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहेत. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. याच दरम्यान धडकी भरवणारी माहिती समोर येत आहे. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. एका व्यक्तीने तब्बल 505 दिवस म्हणजे दीड वर्षे कोरोनाशी झुंज दिली. पण अखेर कोरोनाविरोधातील लढा तो हरला. त्या रुग्णाबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गायज अँड सेंट थॉमसच्या एनएचएस फाउंडेशन ट्रस्टमधील संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ  डॉ. ल्यूक ब्लॅगडन स्नेल आणि त्यांच्या टीमने कोरोनाशी सर्वाधिक कालावधी झुंज देणाऱ्या अशा काही लोकांचा अभ्यास केला. यात आठ आठवड्यांपर्यंत संक्रमित असलेल्या 9 रुग्णांचा समावेश होता. डॉ. स्नेल यांनी "मृत झालेला हा रुग्ण सर्वाधिक कालावधी कोरोनाग्रस्त असलेला रुग्ण आहे, असं स्पष्टपणे सांगू शकत नाही. कारण सर्व कोरोना संक्रमितांची या रुग्णाप्रमाणे नियमित तपासणी करण्यात आली नाही."

"505 दिवस पाहता हा नक्कीच सर्वाधिक कालावधी कोरोनाग्रस्त असलेला रुग्ण असावा" असं म्हटलं आहे. तसेच 2020 मध्ये या व्यक्तीला कोरोना संक्रमण झालं होतं. त्याच्यावर रेमडेसिवीर औषधाने उपचार करण्यात आले. 2021 मध्ये त्याचा मृत्यू झाला. मृत्यूचं कारण काय आहे हे सांगण्यास नकार देण्यात आला आहे. या रुग्णाला इतर आजार होते. या रुग्णासह इतर 9 रुग्णांची रोगप्रतिकारक प्रणाली ही अवयव प्रत्यारोपण, एचआयव्ही, कॅन्सर आणि इतर आजारांच्या उपचारामुळे कमजोर झाली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: CoronaVirus News britain patient was infected with covid 19 for 505 days straight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.