CoronaVirus News : कोरोनाची आणखी एक लस केल्याचा चीनने केला दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 12:27 AM2020-05-20T00:27:08+5:302020-05-20T00:29:22+5:30

CoronaVirus News in Marathi and Live Updates : कोरोना विषाणूविरोधात ही लस प्रतिपिंड (अ‍ॅण्टीबॉडिज) तयार करीत असल्याचे चाचणीतून सिद्ध झाल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. त्या बाबतचा संशोधन निबंध त्यांनी प्रसिद्ध केला आहे.

CoronaVirus News: China claims to have another corona vaccine | CoronaVirus News : कोरोनाची आणखी एक लस केल्याचा चीनने केला दावा

CoronaVirus News : कोरोनाची आणखी एक लस केल्याचा चीनने केला दावा

Next

बीजिंग : चीनच्या प्रसिद्ध पेकिंग विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी कोरोनावरील आणखी एक लस तयार केल्याचा दावा केला आहे. उंदरावरील प्रयोगात शास्त्रज्ञांना यश मिळाले असून, लवकरच वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे. चीनमधे या पूर्वी पाच लस तयार झाल्या असून, त्या मानवी चाचणीच्या टप्प्यावर आहेत.
कोरोना विषाणूविरोधात ही लस प्रतिपिंड (अ‍ॅण्टीबॉडिज) तयार करीत असल्याचे चाचणीतून सिद्ध झाल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. त्या बाबतचा संशोधन निबंध त्यांनी प्रसिद्ध केला आहे. बीजिंगमधील अ‍ॅडव्हान्स इनोव्हेशन सेंटर फॉर जिनॉमिक्सचे संचालक सनी शिए म्हणाले, प्राण्यांवर केलेल्या प्रयोगामधे लशीची परिणामकारकता दिसून आली आहे. उंदरावर केलेल्या चाचणीमधे पाच दिवसांत रोगविरोधात प्रतिपिंड तयार झाले. कोरोनातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्रतिजैविकांचा वापर करण्यात आला.

Web Title: CoronaVirus News: China claims to have another corona vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.