CoronaVirus Live Updates : "मी आणि माझी 5 महिन्यांची लेक 7 दिवस एअरपोर्टवर जमिनीवर झोपलो"; चीनमध्ये परिस्थिती भीषण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 06:37 PM2022-04-29T18:37:55+5:302022-04-29T18:55:13+5:30

चीनमध्ये अत्यंत महत्त्वाचं शहर असलेल्या शांघाईमधून लोक पळ काढत आहेत. अडीच कोटी लोकसंख्या असलेल्या या शहरात अनेक मल्टिनॅशनल कंपन्या आहेत.

CoronaVirus News china corona people running away shanghai beijing strict siegem illions people situation | CoronaVirus Live Updates : "मी आणि माझी 5 महिन्यांची लेक 7 दिवस एअरपोर्टवर जमिनीवर झोपलो"; चीनमध्ये परिस्थिती भीषण

CoronaVirus Live Updates : "मी आणि माझी 5 महिन्यांची लेक 7 दिवस एअरपोर्टवर जमिनीवर झोपलो"; चीनमध्ये परिस्थिती भीषण

Next

चीनच्या शांघाईमध्ये कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. संक्रमण रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळेच लोक येथून पळून जात आहेत. चीनमध्ये अत्यंत महत्त्वाचं शहर असलेल्या शांघाईमधून लोक पळ काढत आहेत. अडीच कोटी लोकसंख्या असलेल्या या शहरात अनेक मल्टिनॅशनल कंपन्या आहेत. त्यामुळे येथे मोठ्या संख्येने विदेशी लोक राहतात. पण आता कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने लोकांनी येथून बाहेर पडण्यास सुरुवात केली आहे. 

आंतरराष्ट्रीय मूवर्स असलेल्या शांघाईच्या M & T चे संस्थापक असलेल्या मायकल फाउंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला साधारणपणे दर महिन्याला जवळपास 30-40 ऑर्डर मिळत होत्या. पण या महिन्यापासून या ऑर्डरमध्ये मोठी वाढ होत आहे. शांघाईमधील लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विदेशी नागरिकांनी खाण्याची व्यवस्था करण्यासाठी समस्यांचा सामना करत असल्याचं म्हटलं आहे. लॉकडाऊनच्या आधी अशी परिस्थिती नव्हती पण आता भीती वाटू लागली आहे. 

शहर सोडून जाणाऱ्या काही नागरिकांनी एअरपोर्टवर पोहोचणं देखील कठीण असल्याचं म्हटलं आहे. कॅबसाठी तब्बल 500 डॉलर खर्च करावे लागत आहेत. त्यासाठी फक्त 30 डॉलर आकारले जात होते. काही फ्लाईट्स रद्द केल्यामुळे लोक एअरपोर्टवरच अडकून पडले आहेत. एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, एका विदेशी नागरिकाने आपल्या पाच महिन्यांच्या मुलीसह पुडोंग एअरपोर्टवरील जमिनीवर झोपून सात दिवस काढल्याचं म्हटलं आहे. मला पुन्हा माझ्या देशात परत जाऊ द्या असं म्हटलं आहे. कोरोनाचा प्रकोप पाहता बीजिंगमधील सर्व शाळा देखील बंद करण्यात आल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

कडक लॉकडाऊनमुळे लोकांना अनेक मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. अन्नधान्याचा तुडवडा निर्माण झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णवाहिकेच्या लाईनमध्ये लोकांचा मृत्यू होत आहे. चीनमधील एक छोटं शहर झिरो कोविड पॉलिसीचा सामना करत आहे. येथे नवव्यांदा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. रुइली असं या शहराचं नवा असून हे शहर चीन आणि म्यानमारमधील व्यापाराचं मोठं केंद्र आहे. गेल्या अनेक आठवड्यापासून येथे लॉकडाऊन आहे. यामुळेच तब्बल दोन लाखांहून अधिक लोक हे शहर सोडून गेले आहेत.160 दिवसांहून अधिक काळ लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यामुळे लोक प्रचंड त्रस्त झाले आहेत.
 

Web Title: CoronaVirus News china corona people running away shanghai beijing strict siegem illions people situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.