CoronaVirus News : परिस्थिती गंभीर! चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार; एका दिवसात 20 हजारांहून अधिक नवे रुग्ण 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 03:36 PM2022-04-06T15:36:56+5:302022-04-06T15:46:06+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: शांघाईमध्ये लॉकडाऊन आणि शून्य कोविड धोरण लागू असूनही, व्हायरसची प्रकरणे वाढली आहेत.

CoronaVirus News china reports 20000 daily corona cases highest since start of covid pandemic | CoronaVirus News : परिस्थिती गंभीर! चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार; एका दिवसात 20 हजारांहून अधिक नवे रुग्ण 

CoronaVirus News : परिस्थिती गंभीर! चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार; एका दिवसात 20 हजारांहून अधिक नवे रुग्ण 

Next

चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. बुधवारी 20,000 हून अधिक कोविड-19 प्रकरणे नोंदवण्यात आली. जी महामारीच्या सुरुवातीपासून सर्वाधिक प्रकरणे आहेत. शांघाईमध्ये लॉकडाऊन आणि शून्य कोविड धोरण लागू असूनही, व्हायरसची प्रकरणे वाढली आहेत. मार्चपर्यंत, चीनमध्ये लॉकडाऊन, चाचणी आणि आंतरराष्ट्रीय प्रवासावर कठोर निर्बंध असल्याने दैनंदिन रुग्णसंख्येवर नियंत्रण होतं. परंतु गेल्या काही आठवड्यात रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. 

नॅशनल हेल्थ कमिशनने एका निवेदनात म्हटले आहे की, "चीनमध्ये बुधवारी 20,472 संसर्गाची नोंद झाली, तर या काळात कोणताही नवीन मृत्यू झाला नाही." यापैकी बहुतेक प्रकरणे लक्षणं नसलेल्या रुग्णांची आहेत. परंतु शांघाईमध्ये सर्वाधिक प्रकरणे समोर येत आहेत. 25 मिलियन लोकसंख्या असलेल्या या शहराने गेल्या आठवड्यात लॉकडाऊनचे अनेक टप्पे लागू केले, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चाचण्या केल्या जात आहेत. आर्थिक राजधानी असलेल्या शांघाईमध्ये अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. लॉकडाऊन लागू करण्यात आला असून लोकांना कारणाशिवाय बाहेर पडण्यास परवानगी नाही.

शांघाईमधील रुग्णालये रुग्णांनी खचाखच भरली आहेत. सर्व वॉर्ड भरलेले असून नव्या रुग्णांना जागाच शिल्लक राहिलेली नाही. आरोग्य यंत्रणेवर देखील ताण आला असून प्रशासनाची चिंता वाढली आहे. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या झीरो कोविड पॉलिसीमुळे लोक आता त्रस्त झाले आहेत. येथे लोकांकडे अन्नपदार्थ देखील शिल्लक राहिलेले नाहीत. एका वयोवृद्ध महिलेने अन्नासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचं देखील सांगितलं आहे. लोकांनी दावा केला आहे की खाण्या-पिण्याचं सामान संपत आहे. तसेच सुपरमार्केट आणि दुकानातील स्टॉक देखील कमी होत आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शांघाईमध्य़े कोरोना संक्रमित असलेल्या लोकांना गायब केलं जात आहे. कारण या लोकांना आयसोलेट करण्यासाठी जागाच शिल्लक नाही. त्यांना दुसऱ्य़ा ठिकाणी पाठवलं जात आहे. कमेंटेटर चेन फेंग याने याबाबत माहिती दिली आहे. प्रत्येक प्रांतात हजार किंवा दोन हजार लोकांना पाठवलं जात आहे. त्यांना जबरदस्तीने पाठवण्यात येत आहे. चीनमधील कोरोनाने पुन्हा एकदा जगाचं टेन्शन वाढवलं आहे. शांघाई प्रांतातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी चिनी सैन्य आणि तब्बल 2,000 हून अधिक वैद्यकीय कर्मचारी पाठवण्यात आले आहेत, जेणेकरून रूग्णांवर उपचार करता येतील.
 

Web Title: CoronaVirus News china reports 20000 daily corona cases highest since start of covid pandemic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.