CoronaVirus News : ऑस्ट्रेलिया म्हणजे अमेरिकेचा कुत्रा; चीनची जीभ घसरली, तणाव वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 05:07 PM2020-05-20T17:07:46+5:302020-05-20T17:16:21+5:30
CoronaVirus News : ऑस्ट्रेलियानं पुढाकार घेतल्यानं चीनचं सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्समधून ऑस्ट्रेलियावर खालच्या पातळीवर टीका करण्यात आली आहे.
बीजिंगः कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, अनेक देशांना त्यावर नियंत्रण मिळवण्यात अपयश आलेलं आहे. अमेरिकेनं कोरोना व्हायरस हा चीनमधील वुहानच्या प्रयोगशाळेत तयार झाल्याचं वारंवार सांगितलं आहे. कोरोना व्हायरसचा उगम नेमका कुठून आणि कसा झाला, याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) माध्यमातून निष्पक्ष व सर्वंकष मूल्यमापन केले जावे, असा प्रस्ताव भारतासह ६२ देशांनी ‘वर्ल्ड हेल्थ अॅसेंब्ली’मध्ये मांडला आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियानं यासाठी पुढाकार घेतला आहे. या प्रस्तावासाठी ऑस्ट्रेलियानं पुढाकार घेतल्यानं चीनचं सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्समधून ऑस्ट्रेलियावर खालच्या पातळीवर टीका करण्यात आली आहे.
चीननं ऑस्ट्रेलियाला अमेरिकेचा पाळीव कुत्रा असल्याचं म्हणत शेलक्या भाषेत हिणवलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेत युरोपिय युनियनच्या प्रस्तावाला पाठिंबा देणं म्हणजे ऑस्ट्रेलिया त्यांच्या देशातील कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरल्याचं सिद्ध होतंय. ऑस्ट्रेलिया हे अमेरिकेच्या हातातलं बाहुलं असल्याचं टीकास्त्रही चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समधून सोडण्यात आलं आहे. कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीवर ऑस्ट्रेलियानं स्वतंत्र तपास करण्याच्या केलेल्या मागणीची चीननं खिल्ली उडवली आहे. ही मागणी कोणत्याही विनोदापेक्षा कमी नाही, असं चीनच्या दूतावासानं म्हटलं आहे. यावर ऑस्ट्रेलियातील मंत्री सिमोन बर्मिंगम यांनी निषेध व्यक्त असून, आम्ही चीनच्या दूतावासासोबत कोणत्याही प्रकारची चर्चा करणार नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
ऑस्ट्रेलियाचे नेते चीनवर आता निशाणा साधत आहेत. परंतु यामुळे त्यांचंच नुकसान होत आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियामध्ये चीनविरोधी वातावरण तयार होत आहे. चीनसोबत हा तणावाचा परिणाम ऑस्ट्रेलियातील शेतकऱ्यांवर होऊ शकतो, असंही ग्लोबल टाइम्समध्ये नमूद करण्यात आलं आहे. दोन्ही देशांमध्ये तणाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं त्याचा परिणाम व्यापारावरही दिसून येत आहे.
चीननं ऑस्ट्रेलियातून येणाऱ्या सर्व वस्तूंवर ८० टक्के आयात शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच काही वस्तूंची आयात बंद करण्यासाठी एक यादीही तयार करण्यात आली आहे. दरम्यान, ‘वर्ल्ड हेल्थ अॅसेंब्ली’ ही ‘डब्ल्यूएचओ’ची धोरणात्मक निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था आहे. भारतासह ३५ देश व २७ सदस्यांचा युरोपीय संघ यांनी मिळून हा नऊ पानी प्रस्ताव मांडला आहे. हा प्रस्ताव मांडणा-या देशांमध्ये अमेरिका व चीन या दोन्ही देशांचा समावेश नाही. भारताने पुढाकार घ्यावा, अशी अनेक देशांची अपेक्षा असतानाच मोदींनी त्यापासून दूर राहण्याचं ठरवलं आहे. तर ऑस्ट्रेलियानं हा ठराव मांडला असून, कोरोनाच्या उत्पत्तीची निष्पक्षपणे चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.
हेही वाचा
गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये पाकिस्तानला बांधायचंय धरण; पण इतिहासप्रेमींचा विरोध कायम
CoronaVirus News : कोरोनानं 90 हजार लोकांचा मृत्यू झाल्यानंतर ट्रम्प म्हणाले, हा तर 'बॅज ऑफ ऑनर'
Cyclone Amphan : तो येतोय..., चक्रीवादळाची चाहूल लागल्यानं घाबरलंय ओडिशा
CoronaVirus News: डोनाल्ड ट्रम्प घेताहेत हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध; तज्ज्ञ म्हणतात...
CoronaVirus News : चिंताजनक! कोरोनामुळे जगभरात 6 कोटी लोक गरिबीच्या विळख्यात सापडणार
Coronavirus: अहो आश्चर्यम्! फक्त दोन वेदनाशामक औषधं घेऊन रुग्ण झाले ठणठणीत, प्रशासनही आश्चर्यचकीत
भारत आमची जागा कधीच घेऊ शकत नाही; कंपन्या बाहेर पडल्यामुळे चीन मोदींवर भडकला
CoronaVirus: लसीशिवाय 'या' नव्या औषधानं ठीकठाक होतायत कोरोनाचे रुग्ण; चीनच्या प्रयोगशाळेचा दावा
CoronaVirus : लढ्याला यश! दोन औषधांनी ४ दिवसांत ६० कोरोनाबाधित रुग्ण झाले ठणठणीत