CoronaVirus News: कोरोनाचा कहर; पुन्हा का वाढताेय?; अमेरिका चिंतेत, डेल्टा ठरताेय डाेकेदुखी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 06:22 AM2021-08-14T06:22:23+5:302021-08-14T06:22:47+5:30
गेल्या काही दिवसांत अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने बायडेन प्रशासन चिंतित झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क : कोरोनाप्रतिबंधक लसीकरणाला वेग देणाऱ्या अमेरिकेत पुन्हा एकदा कोरोना हातपाय पसरू लागला असल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांत अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने बायडेन प्रशासन चिंतित झाले आहे.
काय आहे सद्य:स्थिती?
अमेरिकेत कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे.
येत्या चार आठवड्यांत अमेरिकेच्या विविध भागांत कोरोनामुळे रुग्णालयात भरती होण्याचे बाधितांचे प्रमाण वाढू शकते, अशी भीती सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) यांनी व्यक्त केली आहे.
याच कालावधीत मृत्युदरातही वाढ होऊ शकते, अशी भीतीही सीडीसीने वर्तवली आहे.
पाकिस्तानात चौथी लाट?
पाकिस्तानात एकाच दिवसात १०२ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
पाकिस्तानात आतापर्यंत ५००० बाधित आढळू आले असून कोरोनाची चौथी लाट सुरू झाल्याचे मानले जात आहे.
काय असेल स्थिती?
४ सप्टेंबरपर्यंत ३३०० ते १२,६०० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होऊ शकतो.
५ लाख ते २३,४०,००० पर्यंत नवे कोरोनाबाधित सापडू शकतील.
या चार आठवड्यांमध्ये अमेरिकी रुग्णालयांमध्ये ८,६०० ते ३३,३०० बाधितांना भरती करावे लागण्याची शक्यता आहे.
कोरोनाच्या दोन लाटांचा सामना कराव्या लागलेल्या अमेरिकेत आतापर्यंत ६,३०,००० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
चीनही अस्वस्थ
चीनमध्येही सध्या कोरोनाचे बाधित पुन्हा आढळून येऊ लागले आहेत.
अलीकडेच वुहानमध्ये कोरोनाची लक्षणे असलेले काही रुग्ण सापडल्याने चीन सरकार अस्वस्थ झाले आहे.
कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याच्या बातम्या चीनच्या सुदूर प्रांतातूनही येऊ लागल्या आहेत.
रशियातही वाढले बाधित
रशियात कोरोनाची तिसरी लाट अवतरली आहे.
तिथे एकाच दिवसात ८०८ लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद असून आतापर्यंत २२,००० नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत.