CoronaVirus News: काळजी घ्या! कोरोनाच्या नव्या रुपानं वाढवली चिंता; संशोधनातून समोर आला मोठा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 11:30 AM2021-06-15T11:30:18+5:302021-06-15T11:31:41+5:30

CoronaVirus News: कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा किती धोका?; शास्त्रज्ञांच्या उत्तरानं वाढली चिंता

CoronaVirus News covid 19 delta variant doubles risk of hospitalization says scottish study | CoronaVirus News: काळजी घ्या! कोरोनाच्या नव्या रुपानं वाढवली चिंता; संशोधनातून समोर आला मोठा धोका

CoronaVirus News: काळजी घ्या! कोरोनाच्या नव्या रुपानं वाढवली चिंता; संशोधनातून समोर आला मोठा धोका

Next

नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला देशात दररोज ४ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद व्हायची. आता हाच आकडा लाखाच्या खाली आला आहे. मात्र तरीही तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यातच देशात डेल्टा व्हेरिएंटचं म्युटेशन होऊन डेल्टा प्लस तयार झाला आहे. हा विषाणू जास्त संक्रामक आहे. 

गुड न्यूज! तब्बल 75 दिवसांनी पहिल्यांदाच सुखावणारी आकडेवारी, कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी घट

देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी डेल्टा व्हेरिएंट जबाबदार होता. अधिक संक्रामक असलेल्या या व्हेरिएंटमुळेच देशात कोरोनाची दुसरी लाट आली. आता स्कॉटलंडमध्ये झालेल्या एका संशोधनामुळे चिंता वाढली आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळे रुग्णालयाचा धोका दुपटीनं वाढला आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना डेल्टा व्हेरिएंटपासून संरक्षण मिळू शकतं. त्यामुळे डेल्टाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवण्याची आवश्यकता आहे.

ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या अल्फा व्हेरिएंटच्या तुलनेत भारतात आढळून आलेला डेल्टा व्हेरिएंट अधिक संक्रामक आहे. डेल्टाचा धोका तपासून पाहण्यासाठी स्कॉटलंडमध्ये संशोधन करण्यात आलं. त्यातून डेल्टाचा प्रादुर्भाव वेगानं पसरत असल्याचं आढळून आलं. 'डेल्टा व्हेरिएंटमुळे रुग्णालयात दाखल होण्याचा धोका दुपटीनं वाढला आहे. मात्र लसीमुळे हा धोका कमी केला जाऊ शकतो,' असं स्ट्रेथक्लॉइड विद्यापीठाच्या प्राध्यापक ख्रिस रॉबर्ट्सन यांनी सांगितलं.

Web Title: CoronaVirus News covid 19 delta variant doubles risk of hospitalization says scottish study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.