CoronaVirus News : जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडणार : डोनाल्ड ट्रम्प

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 12:35 AM2020-05-20T00:35:12+5:302020-05-20T00:35:46+5:30

CoronaVirus News in Marathi and Live Updates : अमेरिकेमधे कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत असून, बाधितांची संख्या १५ लाखांवर गेली आहे. चीनने कोरोनाच्या प्रसाराची माहिती लपवल्याचा आरोप ट्रम्प वारंवार करीत आहेत.

CoronaVirus News: Donald Trump to leave WHO | CoronaVirus News : जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडणार : डोनाल्ड ट्रम्प

CoronaVirus News : जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडणार : डोनाल्ड ट्रम्प

Next

वॉशिंग्टन : जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) अमेरिकेने केलेल्या मागण्यांबाबत येत्या तीस दिवसांत योग्य ती पावले न उचलल्यास अमेरिका आरोग्य संघटनेच्या सदस्यत्वाचा त्याग करेल. त्याचबरोबर जागतिक आरोग्य संघटनेला दिला जाणारा निधी कायमस्वरूपी बंद करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. जागतिक आरोग्य संघटना चीनच्या हातातील बाहुले झाले असल्याची खरमरीत टीका देखील त्यांनी केली.
अमेरिकेमधे कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत असून, बाधितांची संख्या १५ लाखांवर गेली आहे. चीनने कोरोनाच्या प्रसाराची माहिती लपवल्याचा आरोप ट्रम्प वारंवार करीत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचा निधी थांबविण्याची घोषणा त्यांनी या पुर्वीच केली आहे. अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेच्या मोठ्या दात्यांपैकी एक आहे. अमेरिकेने २०१८-१९ मधे जागतिक आरोग्य संघटनेला तब्बल ४०० दशलक्ष डॉलरचा निधी दिली होता. ही रक्कम जागतिक आरोग्य संघटनेच्या एकूण निधी पैकी तब्बल १५ टक्के इतकी आहे.
ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रॉस घेब्रेयेसुस यांना पत्र पाठवित जागतिक आरोग्य संघटना कोरोनाबाबत राबवित असलेल्या उपाययोजनांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. आरोग्य संघटनेने सातत्याने चुकीची पावले उचलल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेची पुर्नरचना करण्याची मागणी केली असून, त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याची सूचनाही केली आहे. आरोग्य संघटना रोगाचा प्रसाराची धोक्याची घंटा बजावण्यात अपयशी ठरले. तसेच, त्यांनी चीनने दिलेल्या खोट्या आकडेवारीवर विश्वास ठेवला. जागतिक आरोग्य
संघटनेने चीनने दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवत मानवी प्रसार न झाल्यावर विश्वास ठेवला.

Web Title: CoronaVirus News: Donald Trump to leave WHO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.