CoronaVirus News :मास्क नसल्यास कारावास, कतारने केला कडक कायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 12:52 AM2020-05-19T00:52:21+5:302020-05-19T01:02:26+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates : या साथीने अमेरिका, इटली, फ्रान्स, जर्मनी येथे जसा हाहाकार माजविला तशी स्थिती कतारमध्ये नाही. तरीही सावधगिरीचा उपाय म्हणून कोरोनासंदर्भात कडक कायदे करण्यास सुरुवात केली आहे.
दोहा : कोरोनाचे संकट लक्षात घेता सार्वजनिक ठिकाणी वावरताना तोंडाला मास्क न लावणाऱ्या व्यक्तीस तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा देणारा कायदा कतार या आखाती देशाने केला आहे. असा कायदा करणारा कतार हा जगातील पहिलाच देश ठरला आहे.
या साथीने अमेरिका, इटली, फ्रान्स, जर्मनी येथे जसा हाहाकार माजविला तशी स्थिती कतारमध्ये नाही. तरीही सावधगिरीचा उपाय म्हणून कोरोनासंदर्भात कडक कायदे करण्यास सुरुवात केली आहे. मास्क न घालणाºया लोकांना तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा देण्याचा कायदा करणे हे त्यातील एक पाऊल आहे. या कायद्याप्रमाणे केवळ कारावासच नाही तर त्या व्यक्तीला ५५ हजार डॉलरपर्यंत दंडही ठोठावला जाऊ शकतो.