CoronaVirus News: नवं संकट! जगानं कधीच न पाहिलेला कोरोनाचा स्ट्रेन इस्रायलमध्ये सापडला; धोका वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 08:58 PM2022-03-16T20:58:22+5:302022-03-16T21:00:07+5:30

CoronaVirus News: नव्या स्ट्रेनची लागण झालेले दोन जण सापडले; आरोग्य मंत्रालय अलर्टवर

CoronaVirus News Israel reports confirmed cases of combined Omicron and BA 2 strain | CoronaVirus News: नवं संकट! जगानं कधीच न पाहिलेला कोरोनाचा स्ट्रेन इस्रायलमध्ये सापडला; धोका वाढला

CoronaVirus News: नवं संकट! जगानं कधीच न पाहिलेला कोरोनाचा स्ट्रेन इस्रायलमध्ये सापडला; धोका वाढला

Next

जेरुसलेम: इस्रायलमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेले दोन रुग्ण आढळून आले आहेत. ओमायक्रॉन आणि BA.2 व्हेरिएंटचे विषाणू त्यांच्यामध्ये आढळून आले आहेत. अद्याप जगात कुठेही अशा प्रकारचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले नसल्याचं इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे. इस्रायलमध्ये आढळून आलेल्या नव्या स्ट्रेनमुळे जगासाठी धोका निर्माण झाला आहे.

इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयानं याबद्दल अधिक माहिती दिली आहे. परिस्थिती चिंताजनक नसल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे. इस्रायलमधील बेन गुरियन विमानतळावर उतरलेल्या दोन प्रवाशांचा आरटी पीसीआर अहवाल पॉझिटिव्ह आला. या दोघांच्या शरीरात नवा स्ट्रेन आढळून आला.

अद्याप जगाला या व्हेरिएंटबद्दल कोणतीही माहिती नसल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. नव्या व्हेरिएंटची लागण झालेल्या दोघांना ताप, डोकेदुखी आणि मांसपेशीचे विकार अशी लक्षणं आढळून आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली. लक्षणं सौम्य स्वरुपाची असल्यानं रुग्णांना कोणत्याही विशेष वैद्यकीय सुविधांची गरज नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आल्यानं धोका असल्याची शक्यता इस्रायलच्या पॅनडेमिक रिस्पॉन्सचे चीफ सलमान जरका यांनी सांगितलं. परिस्थिती चिंताजनक नसल्याचं जरका म्हणाले. इस्रायलची लोकसंख्या ९२ लाख इतकी आहे. यापैकी ४० लाखांहून अधिक नागरिकांना कोरोना लसीचे तीन-तीन डोस देण्यात आले आहेत. 

Web Title: CoronaVirus News Israel reports confirmed cases of combined Omicron and BA 2 strain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.