CoronaVirus News : मॉडर्नाची कोरोना लस लवकरच उपलब्ध होणार; जाणून घ्या, किंमत...
By Ravalnath.patil | Published: November 22, 2020 12:16 PM2020-11-22T12:16:40+5:302020-11-22T12:17:22+5:30
CoronaVirus News : कंपनीचे म्हणणे आहे की, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी त्यांची लस 94.5% प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.
फ्रँकफर्ट : अमेरिकेतील मॉडर्ना इंक (Moderna Inc.) कंपनीने कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी लस विकसित केल्याचा दावा केला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी त्यांची लस 94.5% प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. दरम्यान, मॉडर्ना लसच्या एका डोससाठी सरकारकडून 25-37 अमेरिकन डॉलर म्हणजेच 1,854 ते 2,744 रुपये घेतले जाऊ शकतात, असे कंपनीने म्हटले आहे.
मॉडर्ना कंपनीचे कार्यकारी अधिकारी (सीईओ) स्टेफन बांसेल यांनी सांगितले की, लसीची किंमत तिच्या मागणीवर अवलंबून असते. जर्मन साप्ताहिक वेल्ट एम सोनटॅगशी स्टेफन बांसेल यांनी संवाद साधला. यावेळी "आमच्या लसीचे दर 10 ते 50 डॉलर म्हणजेच 741.63 पासून 3,708.13 रुपयांपर्यंत असू शकतात", असे स्टेफन बांसेल यांनी सांगितले.
वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, सोमवारी चर्चेत सहभागी झालेल्या युरोपियन संघाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, युरोपियन संघाला लसीच्या सुमारे कोट्यावधी डोसांची आवश्यकता असेल. युरोपियन संघ प्रति डोस 25 डॉलर (1,854 रुपये) पेक्षा कमी किंमतीत पुरवठा करण्यासाठी मॉडर्ना कंपनीसोबत करार करणार होता.
युरोपियन संघाशी झालेल्या कराराबाबत स्टेफन बांसेल म्हणाले, "अद्याप लेखी किंवा औपचारिकपणे काहीही झाले नाही, परंतु आम्ही युरोपियन कमिशनशी बोलतो आहोत आणि या कराराची पुष्टी करण्याच्या अगदी जवळ आहोत. आम्हाला लस युरोपला पोहोचवायची आहे आणि आमची चर्चा देखील योग्य दिशेने जात आहेत."
दरम्यान, लसीच्या क्लिनिकल चाचणीच्या अंतरिम डेटामध्ये कोव्हिडपासून संरक्षण देण्यात लस 94.5 टक्के प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे, असे मॉडर्ना कंपनीने म्हटले आहे. तसेच, लस mRNA-1273 लवकरच बाजारात येईल असे कंपनीने म्हटले आहे. या वर्षाच्या अखेरीस या लसीचे दोन कोटी डोस आणण्याची कंपनीची अपेक्षा आहे.
पुढील वर्षापर्यंत शंभर कोटी डोस तयार करण्यात येतील, असा दावा कंपनीने केला आहे, मात्र हे औषध लोकांपर्यंअमेरिकन कंपनी मॉडर्नाची कोरोना लस लवकरच उपलब्ध होणार आहे, त्यासाठी किती खर्च येईल हे जाणून घ्यात पोहोचवण्यासाठी मोडर्ना कंपनीला अनेक औपचारिकता पार करावी लागेल. त्यासाठी कंपनी लवकरच सरकारकडे परवानगी मागेल.