CoronaVirus News : अमेरिकेत सक्रिय रुग्णसंख्या ६८ लाखांवर, जगातील अनेक देशांत रुग्णवाढ सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 05:54 AM2021-04-15T05:54:38+5:302021-04-15T05:55:01+5:30
CoronaVirus News : फ्रान्स, रशिया, इंग्लंडमधील रुग्णसंख्या अनुक्रमे ५१ लाख, ४६ लाख, ४३ लाख झाली आहे. फ्रान्समधील सक्रिय रुग्ण ४६ लाखांहून अधिक आहेत.
अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या ३ कोटी २० लाखांवर पोहचली आहे. आतापर्यंत ५ लाख ७७ हजारांवर मृत्यू झाले आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या ६८ लाख ६८ हजारांवर पोहचली आहे.
भारतातील रुग्णसंख्या १ कोटी ३८ लाखांवर गेली आहे. मृत्यूंची संख्या १ लाख ७२ हजारांवर पोहचली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या १३ लाख ६५ हजारांहून अधिक आहे. ब्राझीलमध्ये रुग्णसंख्या १ कोटी ३६ लाखांवर पोहचली आहे. सक्रिय रुग्ण ११ लाख ६८ हजारांहून अधिक आहेत.
फ्रान्स, रशिया, इंग्लंडमधील रुग्णसंख्या अनुक्रमे ५१ लाख, ४६ लाख, ४३ लाख झाली आहे. फ्रान्समधील सक्रिय रुग्ण ४६ लाखांहून अधिक आहेत. रशिया, इंग्लंडमधील सक्रिय रुग्ण अडीच ते पावणेतीन लाखांच्या दरम्यान आहेत.
तुर्की, इटली, स्पेनमधील रुग्ण ३३ ते ३९ लाखांच्या दरम्यान आहेत. तुर्कीत सक्रिय रुग्ण ५ लाखांहून अधिक आहेत. इटलीमधील सक्रिय रुग्ण ५ लाखांवर आहेत. स्पेनमधील सक्रिय रुग्ण १ लाख ८५ हजारांवर आहेत.
जर्मनी, पोलंड, अर्जेंटिनातील सक्रिय रुग्ण अडीच ते सव्वातीन लाख आहेत.
जपान : ३० हजार रुग्ण
जपानमधील सक्रिय रुग्ण ३० हजारांहून अधिक आहेत. यूएईमधील सक्रिय रुग्ण १४ हजारांहून अधिक, सौदीतील सक्रिय रुग्ण ८८२० आहेत. नेपाळमधील सक्रिय रुग्ण ४०५६ आहेत. श्रीलंकेतील रुग्णसंख्या ९५ हजारांवर आहे. सक्रिय रुग्णसंख्या २८६७ आहे. पाकिस्तानातील रुग्ण ७ लाखांवर आहेत, तर सक्रिय रुग्ण ७६ हजारांवर आहेत.